आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सत्तेत पोहोचण्यासाठी भारिप-बहुजनची ताकद वाढवा’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - तिसर्‍या आघाडीच्या माध्यमातून सत्तेत पोहोचण्यासाठी भारिप-बहुजन महासंघाची ताकद वाढवण्याचे आवाहन शनिवारी (22 जून) मेळाव्यात करण्यात आले.

टीव्ही सेंटर चौकातील जैस्वाल मंगल कार्यालयात झालेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महासंघाचे शहर पूर्वचे अध्यक्ष महेंद्र सोनवणे होते. ज्येष्ठ नेते बी. एच. गायकवाड, रमेशभाई खंडागळे, गौतम लांडगे, अमित भुईगळ, प्रा. माणिक कांबळे आदींनी मार्गदर्शन केले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीवर मेळाव्यात चर्चा झाली. मागासवर्गीयांवर होणारे अन्याय रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे, असेही आवाहन करण्यात आले. महात्मा फुले विकास महामंडळाचे अनुदान वाढवावे, लोकशाही अण्णाभाऊ साठे महामंडळ त्वरित सुरू करावे, मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी प्रा. वाल्मीक सरोदे, रामभाऊ पेरकर, प्रज्ञा साळवे आदींची उपस्थिती होती.
औरंगाबाद पूर्व मतदारसंघाची जाहीर केलेली कार्यकारिणी अशी : उपाध्यक्ष - संदीप कंठे, साईनाथ गायकवाड, अनिस शेख, सोनू पवार, दिलीप चाबूकस्वार, महासचिव - मुसा शेख, सचिव - महेंद्र राऊत, लक्ष्मण थोरात, मंगेश ससाणे, राजू लांडगे आदींची निवड करण्यात आली.