आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपनीचे 6 लाख खात्यात वळवले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दिल्लीच्या कंपनीचा चेक मिळवून त्या खात्यातील सहा लाख रुपये आपल्या खात्यावर वळवणाºया कोलकात्याच्या भामट्याविरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीतील भारती इन्फ्राटेल लिमिटेड या कंपनीचे दिल्लीच्या एसबीआय बँकेत चालू खाते आहे. आर्थिक व्यवहारांसाठी कंपनीच्या परवानगीनंतर बँकेस कोणत्याही शाखेतून चेक देता येऊ शकतो. याचा फायदा घेत कोलकात्यातील दिनेशकुमार याने मुंबईतील एसबीआयच्या शाखेतून 5 लाख 95 हजार 765 रुपयांचा चेक मिळवला. त्याने हा चेक कोलकात्यातील कॅनरा बँकेतील आपल्या खात्यात जमा केला. चेक वटण्याची प्रक्रिया आॅनलाइन असल्याने कॅनरा बँकेने 12 नोव्हेंबर 2011 रोजी पंजाब नॅशनल बँकेमार्फत हा चेक एसबीआयच्या सिडको शाखेला पाठवला. यानंतर चेकवरील 5 लाख 95 हजार 765 रुपयांची रक्कम भारती इन्फ्राटेल लिमिटेड कंपनीच्या खात्यातून वजा करीत दिनेशकुमारच्या बँकेतील खात्यावर वळवण्यात आली. हा प्रकार कंपनीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बँकेकडे याची विचारणा केली तेव्हा चेक वटवण्यासाठी आला होता. त्यामुळे ही रक्कम देण्यात आल्याचे एसबीआयच्या बँक अधिकाºयांनी सांगितले.
दरम्यान, या भामट्याने कोलकात्याच्या कॅनरा बँकेतून 90 हजारांची रक्कम काढल्याचे उघड झाले असून उर्वरित रक्कम गोठवण्यात आली आहे. हा चेक खात्यावर जमा होताना त्याची शहानिशा करण्यात आली होती, असे एसबीआयचे मुख्य व्यवस्थापक कमलकिशोर मातुराम यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या भामट्याविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत कदम करीत आहेत.