आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकर्षक बक्षिसाने आश्चर्याचा सुखद धक्का, औरंगाबादेतील कार विजेते तापडियांची प्रतिक्रिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दैनिक भास्कर समूहाची सर्वात मोठी स्पर्धा ‘जिंका १० कोटी’ लक्झरी कार विजेत्यांच्या घोषणेनंतर या स्पर्धेत द्वितीय पुरस्कार असलेल्या ८ ‘आकर्षक कार’ विजेत्यांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. यात औरंगाबादचे ओमप्रकाश तापडिया भाग्यवान विजेते ठरले आहेत. मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास भावाची मुलगी साक्षीचा फोन आला. ती म्हणाली, ‘काका, तुम्हाला कार बक्षीस लागली आहे. ‘दिव्य मराठी’ वृत्तपत्रात आकर्षक कार्सचे भाग्यवान विजेते म्हणून तुमचे नाव आहे. अभिनंदन...’ हे एकूण आकर्षक बक्षिसाने पहिला आश्चर्याचा धक्का दिला, अशा शब्दांत तापडिया यांनी मनोगत व्यक्त केले. पेपर हातात घेऊन खात्री करेपर्यंत जावई, मित्र परिवारांचे फोन सुरू झाले. प्रत्यक्ष नाव बघेपर्यंत कार बक्षीस लागल्यावर विश्वास बसेना. जेव्हा नाव बघितले तेव्हा संपूर्ण कुटुंबाच्या आनंदाला पारावार राहिला नाही, हे सांगताना तापडिया अक्षरश: भारावले. औरंगबादेत ज्योति नगर परिसरात राहणारे तापडिया म्हणाले, लाखो स्पर्धकांमधून मला जे बक्षिस लागले ते माझ्या आईच्या आशीर्वादाचे फळ असल्याचे मी मानतो.

हार्डवेअरचा व्यवसाय
हार्डवअेराचा व्यवसाय असलेले तापडिया म्हणाले, ‘सर्वसमावेशक, सकारात्मक बातम्या, लेख, वृत्तांत असणारे एकमेव दैनिक म्हणून दिव्य मराठीने वेगळी छाप निर्माण केली आहे. इतर माध्यमांपुढे एक आदर्श उभा केला आहे. आमचे संपूर्ण कुटुंब दिव्य मराठीचे नियमित वाचक आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून अशा प्रकारच्या ज्या काही स्पर्धा झाल्या त्यात आवर्जून सहभाग घेतला. कधी बक्षीस लागले नाही, तशी अपेक्षाही केली नाही. जिंका दहा कोटी स्पर्धेनं सर्व वाचकांना आपल्या प्रेमात पाडलं. त्यात मी एक होतो.

एकदा पेपर टाकणाऱ्या बंधुच्या मुलाची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे त्या दिवशी पेपर आलाच नाही. त्यामुळे मला दर्गा रोड येथे जाऊन पेपर आणावा लागला. चिल्लर पैसे नव्हते. विक्रेत्याने तसाच पेपर दिला. इतर दिवशी मात्र,नियमित व वेळेत पेपर मिळाले. ४५ पैकी ३० कूपन चिकटवायचे होते. स्पर्धा साधी पण आगळी वेगळी होती त्यामध्ये उत्साहाने सहभागी झालो. दिवसभर व्यवसायात गुंतून असलो तरी सकाळी ७ ते ८ या वेळेत जमेल तेवढा पेपर वाचायचा व कूपन चिटकावून ठेवायचो. एखाद्या वेळेला पत्नी शारदा हे काम करत असे. लाखातून मला आकर्षक बक्षिस मिळालं, हे माझ्यासाठी अविस्मरणीय आहे, अशी भावना तापडिया यांनी व्यक्त केली.

अभिनंदनाचा वर्षाव
तापडिया म्हणाले, आकर्षक बक्षिसाने माझ्या आयुष्यात मंगळवारचा दिवस अतिशय लकी ठरला आहे. पहिले पुतनीने व दुसरा फोन हरिद्वार वरून जावयाने केला. अशा प्रकारे दिवसभरातून २००हून अधिक फोन आले आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला.

दिवाळीला कार घ्यायची होती...
मित्र परिवार नेहमी कार घे म्हणून सल्ला देत होता. पण व्यवसायात दिवसभर गुंतून पडत असल्याने कारची मला कधी गरज वाटली नाही. मात्र, येत्या दिवाळीला कार खरेदी करण्याचा विचार पक्का केला होता. सुदैवाने आईच्या आशीर्वादाने लाखो स्पर्धकांमधून मला कार बक्षीस मिळाली, असे तापडिया यांनी सांगितले.