आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्म श्रीमंत घरात, कटिंगसाठी चक्क विमानाने नागपूरहून गोव्याला जायचा, आता झाला भिक्खू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गर्भश्रीमंत घरात जन्म झाल्याने लाडावलेला मुलगा कटिंग करण्यासाठी चक्क विमानाने नागपूरहून गोव्याला जायचा, पण बौद्ध भिक्खूंच्या सहवासात येताच आयुष्याला कलाटणी मिळाली. उच्चशिक्षित असून विदेशातील मोठ्या नोकरीची संधी सोडून तो बौद्ध भिक्खू झाला. आता जगभरात त्यांना सन्मानाने भन्ते प्रशील म्हणून ओळखले जाते. 
 
जबिंदा लॉन येथे २९ ऑक्टोबर रोजी झालेल्या बौद्ध परिषदेत भारतासह देश-विदेशातून बौद्ध भिक्खू आले होते. या सर्वात वेगळे होते ते भन्ते प्रशील. त्यांनी स्वत:चा प्रवास सांगितला तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. ते म्हणाले की, मी गर्भश्रीमंत घरात जन्मलो. एखाद्या हीरोसारखा राहायचो. प्रचंड फॅशन केली. हेअरस्टाइलमध्ये तर फेमस होतो. मी मूळ नागपूरचा. तेथून विमानाने वाट्टेल तेव्हा गोव्यात जायचो. हेअर कट करून परत विमानाने यायचो. शिक्षण एमबीए झाले आहे. पदवी मिळताच विदेशी कंपन्यांत मोठ्या हुद्द्यावर नोकरीच्या संधी होत्या, पण बौद्ध भिक्खूंच्या सहवासात आलो अन् जीवनाला नवी दिशा मिळाली. सर्वकाही सोडून धर्माचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार केवळ भारतात नव्हे, तर जगभरात करण्याचे ठरवले. 
 
फ्रान्समध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करणार 
मी गुजरातमध्ये खूप काम केले. इंडो चायना बुद्धिस्ट फेस्टिव्हलसाठी काम करत आहे. थायलंड, कंबोडिया, रंगून येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा त्या देशातील पहिला पुतळा बसवणार आहोत. बाबासाहेबांची १३० वी जयंती आम्हाला फ्रान्समध्ये साजरी करायची आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
बातम्या आणखी आहेत...