आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सध्या तरी "टू वे'लाच परवानगी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भीमजयंतीत डीजे वाजवण्याची परवानगी मिळावी, या आशयाच्या याचिकेवरील पुढील सुनावणी उच्च न्यायालयाने मे रोजी ठेवली असून तूर्तास मिरवणुकीत टू वे साउंड सिस्टिमलाच परवानगी देण्याचे निर्देश पोलिस आयुक्तांना दिले आहेत.
मुकुंदवाडीतील रविकांत पाचुंदे यांनी वरील याचिका दाखल केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली असता पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या वतीने निवेदन करण्यात आले. त्यांनी टू वे साऊंड सिस्टिमला परवानगी देत असून या परवानगीनुसार ५५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाला परवानगी राहणार नाही, असे नमूद केले. पाचुंदे यांनी ध्वनिप्रदूषण नियंत्रण कायद्यांतर्गत डीजे वाजवण्याची परवानगी द्यावी, असा अर्ज पोलिस आयुक्तांकडे केला होता. मात्र आयुक्तांनी निर्णय घेतल्याने त्यांनी अॅड. सिद्धेश्वर ठोंबरेंमार्फत हायकोर्टात याचिका सादर केली. कुठल्याही कोर्टाने डीजे वाजवण्यावर बंदी घातली नसल्याने आयुक्तांना अशी परवानगी नाकारता येत नाही, असा युक्तिवादही याचिकेत करण्यात आला. आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाल्यास पोलिस आयुक्त कारवाई करू शकतात, असेही त्यांनी नमूद केले होते. सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी पोलिस आयुक्तांतर्फे निवेदन केले. हायकोर्टाने याचिका दाखल करून घेऊन पुढील सुनावणी मे रोजी ठेवली आहे. मिरवणुकीसाठी सध्या टू वे सिस्टिम व्यवस्थाच लागू राहील, असे न्या. संजय गंगापूरवाला यांनी स्पष्ट करून आयुक्तांच्या निवेदनाप्रमाणे कार्यवाहीस मुभा दिली.