आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीम फाउंडेशनने गृह योजनेच्या नावावर फसवणूक केल्याचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भीम फाउंडेशनच्या वतीने औरंगाबादसह राज्यभरातील दोन हजार सभासदांकडून गृह योजनेच्या नावाखाली 2 हजार 18 कोटी रुपये गोळा करून घोटाळा केला असल्याचा आरोप बुधवारी सुभेदारी विर्शामगृहात झालेल्या बैठकीत करण्यात आला. भीम फाउंडेशनने 2011 मध्ये भावसिंगपुरा परिसरातील गट नंबर 11 व 2 मध्ये गृह योजना सुरू करण्याचे जाहीर केले होते.

मागासवर्गीयांना स्वस्तात घरे देण्याचा प्रस्ताव होता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून 1200 पेक्षा जास्त लोकांकडून 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करण्यात आली. 18 ते 24 महिन्यांत घरांचा ताबा देण्याचे करारात नमूद केले होते. मात्र, अद्यापही घरांचे स्वप्न पूर्ण होऊ शकलेले नाही. घरे देत नसाल, तर पैसे परत करा, असा पवित्रा सभासदांनी घेतला आहे. झालेल्या बैठकीत पोलिस आयुक्तांना निवेदन देऊन प्रसंगी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

असा आहे घोटाळा
0 संस्थेतील बँकेचा व संस्थेतील घरकुल योजनेचा कुठलाही व्यवहार पारदर्शक नाही.
0 सरकारी-निमसरकारी लेखापरीक्षण झालेले नाही.
0 धर्मादाय आयुक्तांना लेखापरीक्षण अहवाल सादर केला जात नाही.
0 संस्थेतील काही सभासदांना अवैधमार्गाने पैसे पुरवले जातात.
0 संस्थेच्या जमिनी अध्यक्ष मधुकर सूर्यवंशी व सचिव मिलिंद कासारे यांच्या नावाने आहेत.

योजनेला विलंब
योजनेला पैशांअभावी उशीर झाला. एप्रिल-मेपर्यंत काम सुरू होईल. सभासदांचा गैरसमज झाला असून ते व्यर्थ बडबड करत आहेत. ते न्यायालयात अथवा कुठेही गेले, तरी माझे काही बिघडत नाही. औरंगाबादेत दीड हजार सभासद आहेत. मधुकर सूर्यवंशी, अध्यक्ष, भीम फाउंडेशन, मुंबई.

तीन वर्षांपासून भीम फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर सूर्यवंशी आणि त्यांचे पदाधिकारी फसवणूक करत आहेत. शिवाय माझ्याविरुद्ध आरोप करणार्‍यांना घरे देणार नाही, अशी धमकी देत आहेत. या संदर्भात गुरुवारी (20 फेब्रुवारी) सभासदांची बैठक होणार आहे. आनंद मोकळे, सचिव, सम्यक निवास हक्क बचाव समिती, औरंगाबाद.