आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhimasakti Of District Presendent Arun Borde Arrested In Mumbai

भीमशक्तीचा जिल्हाध्यक्ष अरुण बोर्डेला मुंबईत अटक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भीमशक्तीचा जिल्हाध्यक्ष अरुण बोर्डे याला गुरुवारी सकाळी गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक उन्मेष थिटे यांनी मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले. मंत्रालयात बचावासाठी ‘फील्डिंग’ लावण्यासाठी गेलेल्या बोर्डेला मोबाइलच्या लोकेशनवरून पकडण्यात आले.
साई रेसिडेन्सी हॉटेलच्या जागेचा बनावट करारनामा करून मालकाला 20 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी संतोष जाधव, बाबासाहेब जाधव व संजय भास्करे यांना अटक केली होती. मात्र, बोर्डेविरुद्ध भक्कम पुरावे मिळताच आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव व सहकार्‍यांनी बोर्डेला पकडण्यासाठी मनपात सापळा रचला होता. अटकेची भणक लागताच त्याने पोलिसांना हुलकावणी देत मुंबई गाठली. दरम्यान, बोर्डेला अटक झाल्याचे वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले तरी पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी याबाबत माहिती नसल्याचे म्हटले.