आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएचआरच्या अध्यक्ष, संचालकांवर गुन्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीच्या (बीएचआर) अध्यक्षांसह संचालकांवर सिडको ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेवानिवृत्त भालचंद्र ओंकार खोडे (वय ७६, रा. जयभवानीनगर) यांनी १७ एप्रिल २०१३ रोजी बीएचआरच्या सिडको एन-६ येथील शाखेत ९५ हजार ७६८ रुपये ठेव ठेवली. त्यावर आकर्षक व्याजदर, परतावा मिळेल, असे सांगण्यात आले होते. खोडेंप्रमाणेच एन-२ मधील मच्छिंद्र सुरासे (५७) यांनीही लाख १३ हजार रुपयांची ठेव ठेवली होती. पण मुदत संपल्यानंतरही ठेवीची रक्कम त्यावरील व्याज देण्यास सोसायटीने टाळाटाळ केली. पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने खोडे सुरासे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी सोसायटीचे अध्यक्ष भाईचंद हिराचंद रायसोनी (जळगाव) यांच्यासह सोसायटीच्या सर्व संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक गंगावणे करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...