आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhushan Pradhan And Sai Lokur Visit Divya Marathi

आजची तरुण पिढी संवेदनशील - अभिनेत्री सई लोकूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘मी आणि यू’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या टीमने शनिवारी (16 नोव्हेंबर) ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. 13 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार्‍या ‘मी आणि यू’ चित्रपटातील अभिनेता भूषण प्रधान, अभिनेत्री सई लोकूर, दिग्दर्शक नितीन कांबळे, निर्माता अश्विन सावनूर आणि त्यांच्या टीमने आजची तरुण पिढी आणि त्यांची बिनधास्त जीवनशैली यावर गप्पा मारल्या. या चित्रपटात भूषणने ‘मी’ तर सईने ‘यू’ ची भूमिका साकारली आहे.
काय म्हणतो ‘मी’(भूषण प्रधान):
आजच्या तरुण पिढीला सामाजिक संवदेना नाहीत, त्यांना ज्येष्ठांविषयी आदर नाही किंवा ते करिअरला प्राधान्य देता अशी चर्चा आहे. मात्र हा गैरसमज आहे, असे मला वाटते. फेसबुक आणि सोशल नेटवर्किंग साइटची सवय झालेल्या तरुण पिढीतील हा बदल आहे. त्यांचे सामाजिक भान हरपलेले नसून पिढी संवेदनशील आहे, हे मात्र खरे. आतापर्यंत ही पिढी खुल्या पद्धतीने आपले विचार मांडत होती. विचार मांडण्यासाठी त्यांना माध्यम मिळाले आहे. याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे.
वयाच्या अकराव्या वर्षापासून नाटकात काम करून या चंदेरी दुनियेत पदार्पण करणार्‍या भूषणने आता पर्यंत कुंकू, पिंजरा, खल्लास डान्स, एकच चान्स, ओळख, वारस, चारचौघी, घे भरारी या मालिका आणि पारंबी चित्रपट भूमिका साकारली आहे. मनापासून काम करणार्‍या तरुणांना कुठल्याही क्षेत्रात यश मिळते. त्यासाठी केवळ मेहनतीची अपेक्षा आहे. ‘मी आणि यू’या चित्रपटात असे अनेक नवीन प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळतील. त्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपट बघावा असे आवाहनही त्याने केले.
काय म्हणते ‘यू’(सई लोकूर)
सध्याची पिढी करिअरला जास्त प्राध्यान्य देत आहे.आजच्या मुलीदेखील आपले करिअर केल्याशिवाय लग्नाच्या बंधनात अडकायला नकार देत आहेत. करिअर हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय झालेले असते. लहान गावातील अनेक मुले स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने शहरात येतात. मात्र ते शहराच्या वातावरणात वाहून जातात.सध्याच्या पिढीला वाईट सवयी लगेच लागतात. त्यामुळे या पिढी ला कितपत सामाजिक जाणिवा असतील याबाबत शंका आहे. सईला भविष्यात विविधांगी भूमिका साकारायच्या आहे. डॉक्टर, आर.जे. या भूमिका करायला आवडेल असा मानस तिने व्यक्त केला. सईची आई निर्माती असल्याने तिला होम प्रोडक्शनमध्ये काम करताना जे स्वातंत्र्य मिळाले ते इतर ठिकाणी शूटिंग करताना मिळाले नसल्याचे तिने आवर्जून सांगितले. मी आणि यू चित्रपट प्रेक्षकांनी पाहावा, असे आवाहन केले आहे.
मराठी चित्रपटात इफेक्ट देण्याचा पहिला प्रयोग
क्रिश, धूम या चित्रपटांना इफेक्ट देणार्‍यांनी ‘मी आणि यू’ला इफेक्ट दिले आहेत. चित्रपटाच्या बजेटला कुठेही कात्री न लावता कथानकाच्या गरजेनुसार खर्च करून एक चांगली चित्रपट निर्मिती केल्याचे निर्माते अश्विन सावनूर यांनी सांगितले. फेसबुकसारखा विषय चांगल्या प्रकारे हाताळून चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. मराठी प्रेक्षकांना अनेक नवीन प्रयोग पाहायला आवडणार असून ते त्यांना आवडतील. संग्राम पाटील यांच्या कथेवर हा चित्रपट आधारलेला असून संवाद अरविंद जगताप यांनी लिहिले आहेत, असे दिग्दर्शक नितीन कांबळे यांनी सांगितले.