आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bibi Ka Maqbara News In Marathi, Mogal, Deccan, Taj Mahal, Divya Marathi

वाह..! दख्खनचा ताज !!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मोगलकाळातील बीबी का मकबरा ही दख्खनमधील उत्तम वास्तू आहे. आग्रा येथे ताजमहालाच्या निर्मितीनंतर त्याच्याच धर्तीवर दख्खनमध्ये वास्तू असावी या दृष्टिकोनातून बीबी का मकबरा उभारण्यात आला. शहराच्या पश्चिमेस असलेल्या सिहांचल पर्वतरांगांच्या पायथ्याशी मकबरा उभारला आहे. मकब-यामध्ये केलेले कोरीव नक्षीकाम सर्वांनाच भुरळ पाडणारे असून याच्या निर्मितीसाठी काही ठिकाणी मार्बलचा वापर करण्यात आला आहे. चारबाग पद्धतीवर मकब-याची निर्मिती झालेली आहे. मकब-याच्या सुरक्षेसाठी येथे भक्कम तटबंदी उभारण्यात आली आहे. तटबंदीच्या चारही बाजूंना अष्टकोनी बुरूज आहेत.

मोगलांच्या काळात पाण्याला विशेष महत्त्व होते. त्यामुळे बहुतेक वास्तू नदीच्या काठी उभारण्यात आल्या. यमुना नदीतीरी ताजमहाल तर बीबी का मकबरा खाम नदीच्या तीरावर उभारण्यात आला. डॉ. कुरेशी म्हणाल्या, इ.स. 1900 मध्ये निझाम उस्मान अली खान याने शहरात एक आलिशान हॉटेल सुरू केले होते. शहरातून बरेच अंतर असताना त्या हॉटेलपासून मकबरा दिसायचा. मकब-याचे दृश्य दिसावे म्हणून दूरदूरपर्यंत एकही बहुमजली इमारत बांधण्यास त्या वेळी बंदी होती.

पुढे वाचा बीबी का मकब-याचा इतिहास....