आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bibi Ka Maqbara News In Marathi, Small Taj Mahal, Aurangabad, Deccan, Divya Marathi

दख्खनचे ताजमहाल: प्रेमाचे प्रति‍क असलेला बीबी का मकबरा दुरूनच बरा !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताजमहालाची प्रतिकृती असलेल्या औरंगाबादेतील बीबी का मकब-याला प्रशासनाच्या दुरवस्थेचे ग्रहण लागले आहे. वास्तुशास्त्राचा अजब नमुना असणा-या मकब-याच्या अनेक भिंतींचे प्लास्टर जागोजागी उखडले आहे. डोळ्याला सुखावणारी हिरवळ आणि कारंजे केव्हाच नाहीसे झाले आहेत, तर मकब-याच्या घुमटावर झाडे उगवल्याने वास्तू खिळखिळी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पवित्र कबरीवरील भिंती जाळे आणि जळमटांनी व्यापल्यामुळे पर्यटकांची घोर निराशा पाहायला मिळते. राज्याच्या पर्यटननगरीत दख्खनच्या ताजची ही दुरवस्था पर्यटनाबाबत शासनाचे गांभीर्य दाखवून देते.


जगप्रसिद्ध वेरूळ-अजिंठा लेणी, दौलताबादचा किल्ला आणि पाणचक्कीसोबतच बीबी का मकब-यामुळे औरंगाबाद शहर पर्यटनाच्या जागतिक नकाशावर येते. या पर्यटनस्थळांमुळेच औरंगाबादला राज्याच्या पर्यटन राजधानीचा दर्जा मिळालाय, पण लालफितीचा कारभार आणि मतांच्या राजकारणावर परिणाम न करणारा घटक म्हणून पुरातन वास्तू सातत्याने दुर्लक्षित राहिल्या आहेत. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणा-या ताजमहालाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबराही शासनाच्या अनास्थेचा बळी पडतोय. त्यामुळे या वास्तूचा अस्ताकडे प्रवास सुरू झाला असल्यासारखेच वाटते.


पुढे वाचा बेबी का मकब-याचा इतिहास...