आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ 10 मिनिटांत 10 वेळा म्हणाले, ‘अच्छा काम किया, ऑल द बेस्ट प्रतीक’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पहिल्याच चित्रपटातील अभिनय पाहून चक्क महानायक अमिताभ बच्चन यांनी स्वत:हून माझे कौतुक करणे आणि १० मिनिटांतच १० पेक्षा जास्त वेळा कारकीर्दीसाठी शुभेच्छा देणे, हीच खरे तर अभिनय कारकीर्दीची योग्य अन् अप्रतिम सुरुवात असल्याचे मत व्यक्त केले आहे “बॉइज’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या प्रतीक लाडने. या चित्रपटात प्रतीक हा पार्थ भालेराव, सुमंत शिंदे, संतोष जुवेकर, वैभव मांगले, भाऊ कदम, झाकीर हुसेन, शर्वरी जमैनीस यांच्यासोबत काम करतोय. विशेष म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री सनी लियोनने मराठीत प्रथमच या चित्रपटात लावणी नृत्य केले आहे. प्रतीक हा मूळचा जालना जिल्ह्यातील परतूरचा असून औरंगाबादमध्ये त्याची जडणघडण झाली आहे. या प्रवासाबाबत प्रतीकच्या भावना त्याच्याच शब्दांत… 

‘अभिनयाची आवड बालपणापासूनच होती. शाळेत किंवा अन्य ठिकाणी छोट्या-मोठ्या कार्यक्रमांत नाटकं वगैरे करायचो. आठवीत असताना कुटुंबीयांसह औरंगाबादला राहायला आलो. वडील परतूरला शिक्षक आहेत, पण माझ्यासाठी ते औरंगाबादहून येणे-जाणे करतात. आ. कृ. वाघमारे शाळेत शिकत असतानाच विनय शाक्य, रवी धनवे दिग्दर्शित “ढाण्या’ या शॉर्टफिल्ममध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यातील अभिनय पाहून अनिकेत हारेर या होतकरू युवकाने “पिरेम’ लघुपटासाठी माझी निवड केली. पिरेमने खऱ्या अर्थाने मला माझ्या अभिनयाची पावती दिली. आता यापुढे अभिनयातच कारकीर्द करायची आहे. सध्या सुरुवात असली तरी गंभीर भूमिका साकारण्याची मला खूप जास्त इच्छा आहे.’ अमिताभ व पार्थ यांची ओळख आहे. पार्थच मला त्यांच्याकडे घेऊन गेला. त्यांनी आमच्या चित्रपटाचा ट्रेलर बघितला होता.  पहिल्याच चित्रपटाचे आणि त्यातील अभिनयाचे खुद्द महानायकाकडून कौतुक होणे माझ्यासाठी अकल्पित होते. ते सतत माझ्या पाठीवर हात ठेवून होते आणि १० मिनिटांतच १० पेक्षा जास्त वेळा त्यांनी मला “आपने अच्छा अभिनय किया, ऐसे ही करते रहो, ऑल द बेस्ट’ अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या. हा क्षण माझ्यासाठी अवर्णनीयच आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या पार्थसोबत अभिनयाची संधी 
अमिताभ बच्चन यांच्यासोबत “भूतनाथ’मध्ये काम करणारा पार्थ भालेराव आणि मी या चित्रपटात मित्र आहोत. आमच्यात छान मैत्री झाली आहे. एका अन्य मित्राला त्याच्या आईला भेटवण्यासाठी आमचा संघर्ष या चित्रपटात दाखवला आहे. उनाडक्या करणारे शालेय मित्र किती गंभीर असू शकतात, याचं सुंदर वर्णन यात केलं आहे, असे प्रतीक सांगताे.
बातम्या आणखी आहेत...