आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळीचा फटका; ११ हजार हेक्टर बाधित, सिल्लोडमधील ८० पेक्षा जास्त गावांना फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिल्लोड - अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून निसर्गाच्या या दणक्याने शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

मागील आठवड्यात दोन दिवस झालेला पाऊस आणि गारपिटीमुळे तालुक्यातील १३२ पैकी ८० गावांतील ११ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे. तालुक्यातील एक लाख दहा हजार हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्र असून खरीप हंगामात एक लाख हेक्टरवर पेरणी होते. अत्यल्प व अनियमित पावसामुळे नुकसान होऊन खरीप हंगामात ५० टक्क्यांपेक्षा कमी उत्पादन झाले.

मका व कापसाला भाव नसल्याने मोठा फटका बसला. खरिपातील तूट भरून काढण्यासाठी रब्बी हंगामात पेर वाढली. साधारणपणे तालुक्यात १० हजार हेक्टरवर रब्बी हंगामात पेरणी करण्यात येत होती. दोन वर्षांपासून संरक्षित पाण्याचे क्षेत्र वाढल्याने पेरणीचे क्षेत्रही वाढले. मागील वर्षी १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी करण्यात आली होती, तर यंदा २९ हजार ५०९ हेक्टरवर पेरणी झाली; परंतु १ मार्चपासून सुरू झालेला अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील गव्हाचे व पाच हजार हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याचे नुकसान झाले.

११ व १२ एप्रिल रोजी झालेल्या गारपिटीने उशिरा पेरलेला गहू, २ हजार ६६७ हेक्टरवरील उन्हाळी मका, १ हजार ३०१ हेक्टर क्षेत्रावरील कांदा बियाणे व अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. सरासरी रब्बी हंगामातील ११ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. आठ दिवसांत कांदा घरात आला असता, पण मध्येच पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे परिश्रम वाया गेले. सरासरी ७० हजार रुपये क्विंटल भाव मिळणे अपेक्षित होते. ११२ गावांमध्ये १ ते ४१ हेक्टरपर्यंत लागवड करण्यात आली आहे.

यंदा आमरस महागणार
यंदा चांगला मोहर आल्यामुळे उत्पादनही चांगले झाले. अनेक झाडे कैऱ्यांनी लगडली होती. त्यामुळे नातेवाइकांना बोलावून आमरसाचा बेत आखण्याचा अनेकांचा मानस होता; पण गारपिटीमुळे आंबे पडले आणि एरवी ५० रुपये किलो दराने विकले जाणारे आंबे आज पाच ते दहा रुपये किलो दराने विकले जात आहेत.
मंडळनिहाय लागवड क्षेत्र (हेक्टरमध्ये)
सिल्लोड ४१२८
निल्लोड ४३१९
आमठाणा १६७०
भराडी २८६४
अंभई ४८६५
गोळेगाव ३८४८
अजिंठा ४६३६
बोरगाव बाजार ३१७८
डिसेंबरपासून झालेला पाऊस (मिमीमध्ये)
डिसेंबर २४.२४
जानेवारी ८.४९
फेब्रुवारी ५.८७
मार्च ५६.२३
पुढे वाचा, बेमोसमी पावसाने शेतकरी हलावदिल...