आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Big Rally Of Medha Patkar, Anna Against Land Acquisition On 24 February

‘भूसंपादन’विरुद्ध चलो दिल्ली नारा; मेधा पाटकर, अण्णांचा २४ फेब्रुवारीला महामोर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गरीब शेतक-यांचे प्रश्न व भू संपादन कायद्यातील बदलामुळेच दिल्लीमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागला, अशी टीका नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी बुधवारी केली. भूसंपादन कायद्याच्याविरोधात २४ फेब्रुवारीला दिल्लीत महामोर्चा काढण्यात येणार असून, यामध्ये ज्येष्ट समाजेसवक अण्णा हजारे सहभागी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोदी सरकार भूसंपदान कायद्यात करत असलेले बदल हे शेतकरीिवरेाधी आहेत. त्यामुळे त्याविरोधात आंदोलन केले जाणार आहे. दिल्ली निकालातून जनतेचा उद्वेग बाहेर आला. लोकांच्या मनात भ्रष्टाचाराच्या विरोधात राग आहे. तो त्यांनी निवडणुकीच्या माध्यमातून व्यक्त केला, असे त्या म्हणाल्या. दिल्लीत मोदींनी सर्व यंत्रणा उभारुनही त्यांचा पराभव झाला. भाजपने खासदार, मंत्री तसेच इतर यंत्रणा तैनात केली होती. मात्र सामान्य जनतेने नव्या सरकारचा पर्दाफाश केला. त्याचे स्वागतच केले पाहिजे. मुंगीने हत्तीला पाडले असेच म्हणता येईल, असे पाटकर म्हणाल्या. पत्रकार परिषदेला सुभाष लोमटे, मनीषा चौधरी,जयाजी सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
जमिनी परत करा
तीन वर्षांत ४० सहकारी साखर कारखाने विकले. शेकडो कोटींच्या जागा मातीमोल भावात विकल्या. खरेदीदार सर्वच पक्षांचे नेते आहेत. मागच्या सरकारने चौकशी समिती नेमली होती. मात्र अहवाल आलेला नाही. शेतक-यांच्या या जमीनी परत करण्याची मागणी पाटकरांनी केली.