आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपार्टमेंटमध्ये घुसुन जाळली बाईक, औरंगाबादेतील लक्ष्मीनगर येथील प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पैठण रोडवरील लक्ष्मीनगर येथे समर्थ अपार्टमेंटमध्ये अज्ञात व्यक्तीने एक बाईक जाळल्याचा प्रकार घडला आहे. या अपार्टमेंटमध्ये राहणारे डॉ. मयुर कुलकुर्णी यांची स्प्लेंडर ही बाईक जाळण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी 7च्या सुमारास डॉ. कुलकर्णी यांच्या ही बाब निदर्शनास आली. तेव्हा बाईक जळून अक्षरश: कोळसा झालेली होती. यानंतर सातारा पोलिस स्टेशनमध्ये याविरोधात त्यांनी तक्रार दाखल केली असून पोलिस पुढील तपास करत आहे. 
बातम्या आणखी आहेत...