आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये दुचाकी जाळली, वाहने जाळणारी टोळी पुन्हा सक्रिय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरात पुन्हा वाहने जाळणारी टोळी सक्रिय झाली अाहे. इंदिरानगर येथील घरासमोर उभी केलेली दुचाकी शनिवार मध्यरात्री विकृतांनी पेटवून दिली. वाहने जाळण्याची मागील दहा दिवसांतील ही तिसरी घटना आहे.
 
गारखेडा परिसरातील इंदिरानगरातील अनिल हरिभाऊ पटेकर (३१) यांनी १८ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजता त्यांची दुचाकी (एमएच २० बीयू २७६०) घरासमोर उभी केली होती. त्यानंतर अवघ्या तीन तासांत त्यांना दुचाकी जळत असल्याचे दिसले. पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत दुचाकीचे मोठे नुकसान झाले होते. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी च्या सुमारास त्यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गायके करत आहेत. 

पंधरा दिवसांतील तिसरी घटना
१२फेब्रुवारी रोजी मध्यरात्री औरंगपुऱ्यातील जनता बाजार येथील पार्किंगमध्ये चार कार जाळण्यात आल्या. १५ फेब्रुवारी रोजी पहाटे संजयनगर भागात एक रिक्षा पेटवण्यात आली. छोटे उस्मान शेख यांनी त्यांची रिक्षा मंगळवारी रात्री घरासमोर उभी केली असता बुधवारी पहाटे रिक्षा जळून खाक झाली होती. त्यापूर्वी मुकुंदवाडी परिसरातील ठाकरेनगरमध्ये दुचाकी जाळण्याचे प्रकार सुरू झाले होते. वाळूज, मुकुंदवाडी भागात डिसेंबर, जानेवारी महिन्यात जवळपास ते दुचाकी जाळण्यात आल्या होत्या. 
बातम्या आणखी आहेत...