आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिनाभरानंतर वाहन जाळणारा पुन्हा सक्रिय, गावातील अंतर्गत वादातून वाहने जाळल्याचा संशय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - बजाजनगरातशेकडो वाहने जाळून आसुरी आनंद लुटणाऱ्या माथेफिरूने आता रांजणगाव शेणपुंजी येथील वाहनांवर वकृदृष्टी टाकली आहे. त्याने गुरुवारी पहाटे देवगिरी कॉलनी येथील राहुल रमेश भोसले सतीश वामन गाढवे यांच्या दोन दुचाकी जाळल्या. तथापि, वाहन जळीत प्रकार हा गावातील अंतर्गत वादातून झाल्याचा संशय पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी व्यक्त केला आहे.

गोळीबाराचा विसर
१८मार्च रोजी वाहन जाळण्यासाठी आलेला माथेफिरू आणि पोलिसांत चकमक उडाली होती. त्यात माथेफिरूने मारलेल्या दगडामुळे गुन्हे शाखेचे पोलिस नाईक नवनाथ परदेशी जखमी झाले होते, तर गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे यांनी त्याला जागेवर थांबण्याचा इशारा देत त्याच्या दिशेने सर्व्हिस रिव्व्हॉल्व्हरमधून दोन गोळ्या झाडल्या होत्या.

मात्र,अंधाराचा फायदा घेऊन माथेफिरू पळून जाण्यात यशस्वी झाला होता. पोलिस सरळ गोळी मारत असल्याची धास्ती घेतल्यामुळे तब्बल महिनाभर माथेफिरू दबा धरून बसला होता. त्यामुळे नेम हुकला तरी माथेफिरूवर जरब निर्माण झाल्याची चर्चा नागरिकांतून होती. मात्र, वाहन जाळण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाल्याने नागरिक पुन्हा दहशतीखाली आले आहेत.

महिनाभरानंतरची पहिली
रांजणगावशेणपुंजी येथे पहिल्यांदाच दुचाकी जाळण्याची घटना घडल्यामुळे कामगारवर्गात भीती आहे. देवगिरी कॉलनीतील सतीश गाढवे यांनी त्यांची दुचाकी (एमएच २० बीएस ८७५४) तसेच शैलेश प्रदीप बडजादे (२६) यांची दुचाकी (एमएच २० डीएच ५०७६) राहुल भोसले यांच्या अंगणात उभी केली होती. गुरुवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास माथेफिरूने दोन्ही दुचाकी पेटवून दिल्या. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे,पोलिस उपनिरीक्षक अजयकुमार पांडे, वसंत शेळके आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शैलेश बडजादेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रांजणगाव शेणपुंजी येथील देवगिरी कॉलनीत गुरुवारी पहाटे दोन दुचाकी जाळण्यात आल्या. पुढील स्लाईडवर इतर फोटो छाया : धनंजय दारूंटे