आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद-जालना प्रवासापेक्षा दुचाकींचे पार्किंग झाले महाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- रेल्वे प्रशासनाने पार्किंगच्या दरात दुपटीने वाढ केल्यामुळे औरंगाबाद, जालना प्रवास भाड्यापेक्षा पार्किंगवर जास्त खर्च होत आहे. प्रवासासाठी 15 तर पार्किंगसाठी 20 रुपये मोजावे लागत आहेत. पार्किंगच्या दरात दुप्पट वाढ केल्याने वाहनधारक आणि कंत्राटदारामध्ये वाद होत आहेत.
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने 1 मे पासून पार्किंगच्या दरात भरमसाट वाढ करण्यात आली. दरवाढ करताना प्रशासनाने कुठल्याही प्रकारच्या सूचना मागवल्या नाहीत. पार्किंगमध्ये पैशावरून वाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत होत आहे. सिकंदराबाद, विजयवाडा आदी शहरांतील वाहन संख्या डोळ्यासमोर ठेवून येथील दरवाढ केली.
अशी केली दरवाढ :
नांदेड विभागाने औरंगाबाद व परभणी रेल्वेस्थानकाच्या पार्किंगची निविदा काढली. 28 जानेवारी 2014 निविदा अर्ज विक्रीची शेवटची तारीख होती. 29 जानेवारी 2014 रोजी निविदा उघडण्यात आली. रेल्वे प्रशासनाने औरंगाबाद स्थानकाचे तीन वर्षांसाठीचे पार्किंगचे कंत्राट बंगळुरू येथील सोमाश्ेाखर रेड्डी यांना दिले. उपरोक्त कंत्राट 2 कोटी 38 लाख 50 हजार 471 रुपयांमध्ये देण्यात आले. परभणी स्थानकाचे तीन वर्षांसाठीचे कंत्राट 84 लाख 99 हजार 619 रुपयांना देण्यात आले.
रेल्वे प्रवासापेक्षा पार्किंग महाग :
शहरातून जालना, परतूर, सेलू, मानवत, परभणी, लासूर, रोटेगाव, मनमाड आदी ठिकाणी चाकरमान्यांसह विद्यार्थी मोठय़ा प्रमाणावर नियमित ये-जा करतात. औरंगाबादहून जालनापर्यंतचे साधारण गाडीचे रेल्वेभाडे 15 रुपये आहे. लासूरचे भाडे 10 रुपये, रोटेगाव 20 रुपये, मनमाड 30 रुपये भाडे आहे.