आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून दुचाकी चोरास पकडले. त्याच्याकडून दुचाकी जप्त करण्यात आली. शेख बाबा शेख शहानूर (२८, रा. विजयनगर, गारखेडा) असे त्या चोरट्याचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अमोल सातोदकर हे आपल्या सहकाऱ्यांसह गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी गस्त घालत असताना त्यांना एक दुचाकी चोर गजानन महाराज मंदिर चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. यावरून सातोदकर त्यांच्या सहकाऱ्यांनी गजानन महाराज चौकात सापळा रचला. तेव्हा संशयित दुचाकी (एमएच २० एस १२५६) येताना दिसली. पोलिसांनी शेख याला पकडून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी खाक्या दाखवताच एक वर्षापूर्वी मुकुंदवाडी भागातून दुचाकी चोरल्याची कबुली त्याने दिली. दरम्यान, गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला अटक करून दुचाकी जप्त केली. त्याला मुकुंदवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक अमोल सातोदकर, कॉन्स्टेबल शेख हबीब, विलास वाघ, प्रदीप गोमटे, विश्वास शिंदे, अप्पासाहेब खिल्लारे, संतोष काकडे, विलास सुंदर्डे यांनी केली.