आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अख्खी सीबीझेड पोत्यात!विशेष पोलिस पथकाची कामगिरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कोपऱ्यातल्यापोत्यात काय आहे? अशी विचारणा पोलिस उपनिरीक्षक प्रशांत आवारेंनी केली. त्यावर टोळीच्या प्रमुखाने ‘साहेब, त्यात एक सीबीझेड मोटारसायकल आहे,’ असे उत्तरदिले. ‘काय, गंमत करतो काय?’ असे त्यांनी दरडावून विचारल्यावर त्या प्रमुखाने पोते उघडले. त्यातील एक-एक पार्ट बाहेर काढून दाखवला. तेव्हा आवारेंसह त्यांचे सहकारीही थक्क झाले. चोरट्यांनी सीबीझेड मोटारसायकलचे सर्व भाग सुटे करून ते पोत्यात भरलेले होते. अशा पद्धतीने दुचाकी एका शहरातून दुसऱ्या शहरात सहज नेता येते म्हणून आम्ही हा फंडा वापरला, असाही कबुलीजबाब या टोळीने दिला.
राज्यभरात विविध ठिकाणी वाहने चोरणाऱ्या टोळीला पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी जेरबंद केले. यात तीन चोरट्यांसह एका अल्पवयीन बालकाचा समावेश आहे. ही टोळी एका जिल्ह्यातून चोरलेली वाहने दुसऱ्या जिल्ह्यात विक्री करत होती. सोमवारी दुपारी एक वाजता चिकलठाण्याजवळील हिनानगर परिसरात ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. त्यांच्याकडून पाच दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. गणेश मारुती मोहिते (१८), सागर रामदास गायकवाड (२१), आदिनाथ धनवटे (२१) आणि एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. हे सगळे नेवासा फाट्याजवळील भाऊसाहेबनगर येथील रहिवासी आहेत.
हिनानगरात काही मंडळी सातत्याने संशयास्पदरीत्या ये-जा करतात. रात्री-अपरात्री मेटॅडोर आणतात. त्यात माल भरून नेतात. बहुधा दुचाकी, चारचाकी चोरणाऱ्यांची टोळीच असावी, अशी पक्की माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली होती. त्यावरून तातडीने मोहीम हाती घेण्यात आली.
चाकी चोरांची राज्यस्तरीय टोळी गजाआड; चौघांना अटक
१० दिवसांत चार प्रकरणांचा निकाल : चोरीआणि घरफोडीचे वाढते प्रकार लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांच्या सूचनेनुसार पोलिस उपायुक्त वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने गेल्या दहा दिवसांत दोन घरफोड्यांचे चोर, एक मोबाइल चोर आणि आज वाहनचोरांच्या आंतरराज्य टोळीला पकडण्यात यश मिळवले आहे.
मुलांमार्फत पाळत
कुठल्यादुचाकी पळवायच्या याचा निर्णय झाल्यावर ही टोळी अल्पवयीन मुलांना त्या भागात नजर ठेवण्यासाठी सोडून द्यायची. ही मुले दुचाकीचा मालक केव्हा येतो केव्हा जातो, याची इत्थंभूत खबर द्यायची. मग हे चोरटे मास्टर चावीने कुलूप उघडून हिनानगरात आणायचे. तेथे तासाभरात सर्व भाग सुटे करून ते पोत्यात भरून दुसऱ्या शहरात न्यायचे. तेथे सर्व भाग जोडून दुचाकी तयार करायची आणि शक्यतो ग्रामीण भागातील बाजारांमध्ये विकायची. त्यासाठी बनावट कागदपत्रेही तयार केली जायची. औरंगाबादेत दररोज किमान दुचाकी चोरीस जातात. ग्राहकांची पसंती असलेल्या होंडा, यामाहा पळवण्यावरच चोरट्यांचा भर असतो.
सापळ्यात अडकले
पोलिसांचेपथक पोहोचले तेव्हा टोळीतील दोन जण एका पत्र्याच्या शेडजवळ उभी असलेली दुचाकी चोरण्याच्या तयारीत होते. त्याच वेळी पोलिस उपनिरीक्षक प्रशांत आवारे, कल्याण शेळके, योगेश गुप्ता, सचिन काशीद, विवेकानंद औटी, संदीप धर्मे यांनी चौघांनाही पकडले.
लुटीचेही गुन्हे
पोलिसांनीसांगितले की, आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. चोरी, दरोडे, लूट असे अनेक गुन्हे त्यांच्यावर आहेत. त्यांच्याकडून औरंगाबाद शहरातील तर दौंड येथील एक दुचाकी ताब्यात घेण्यात आली.