आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी मालकांची उडाली झोप, वाहनांच्या जाळपोळीनंतर सीट फाडणा- यांमुळे नागरिक त्रस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - वाहनांना पेटवण्याचे प्रकार वाढल्यामुळे धास्तावलेल्या नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली. वाळूजमध्ये दुचाकींचे सीट फाडले जात असल्याने वाहनधारकांची झोप उडाली आहे. चार दिवसांत तब्बल २७ दुचाकींचे सीट फाडल्यामुळे लोकांचे प्रचंड नुकसान झाले. सीट फाडताना एक माथेफिरू सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवली आहे.
वाळूजमध्ये गेल्या चार वर्षांपासून दुचाकी कारला पेटवण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यात आतापर्यंत जवळपास दीडशेवर वाहनांना जाळण्यात आले. या प्रकाराला काही महिन्यांपासून आळा घालण्यात पोलिसांना यश आले. आग लावण्याचे प्रकार थांबल्याने रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता; पण आता मात्र रात्रीच्या वेळी घरासमोर उभ्या केलेल्या दुचाकींचे सीट फाडून नुकसान करण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

गावाची लोकसंख्या सुमारे ३५ हजारांवर आहे. या पार्श्वभूमीवर गावात सुमारे हजारांवर दुचाकी वाहने आहेत, तर चार दिवसात संबंधित माथेफिरूने २७ वाहनांना लक्ष्य करून त्यांचे सीट फाडण्याचे प्रकार सुरू केले आहेत. आतापर्यंत कुंदन कांकरिया, पंकज भाले, विष्णू मुळे, ऋषिकेश लोमटे, किशोर भाले, दिनकर रत्नपारखी, डॉ. सुनील लघाने, रवी मनगटे, केदार खोचे, रोहित परोडकर, प्रवीण शिंगरे, अफरोज सय्यद, अॅड. राजेंद्र रत्नपारखी, अनिल गायकवाड, पंकज मनगटे यांच्यासह कमलापूर मार्गावरील १० दुचाकी इतर २७ दुचाकींना माथेफिरूंनी लक्ष्य केले आहे.

शांतता समिती बैठकीत विषय
ईदसण ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाळूज पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक १५ जुलै रोजी घेण्यात आली. यात वाहनांचे नुकसान करण्याच्या घटनांचा प्रामुख्याने उल्लेख करून चित्रफीत पोलिसांना देण्यात आली. त्यावर रात्रीची गस्त वाढवण्याच्या कार्यवाहीचे स्पष्टीकरण देण्यात आले. व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शरदचंद्र अभंग, महात्मा तंटामुक्त गाव समितीचे बबनराव गायकवाड, शेख जमील अहेमद, संतोष धुमाळ, कुंदन कांकरिया यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

वाहनधारकांचीतक्रार नाही
वाहनांचेनुकसान करतानाचे सीसीटीव्ही फुटेज नागरिकांनी दिले आहेत. मात्र, नुकसान झालेल्या वाहनधारकांनी तक्रार केलेली नाही. रात्रीची गस्ती वाढवली आहे. व्यापाऱ्यांनी बंद पडलेले कॅमेरे तातडीने सुरू करून घ्यावेत. धनंजययेरुळे, पोलिसनिरीक्षक, वाळूज पोलिस ठाणे.

"ते' कॅमेरे बंद
वाळूजयेथील व्यापारीवर्गाच्या सहकार्याने पोलिसांनी कॉम्रेड जीवनलाल पाटणी प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजंनी त्याचबरोबर सराफा बाजार परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. मात्र, कुंदन कांकरिया यांच्या सीसीटीव्हीतील चित्रीकरणानंतर माथेफिरू युवकांबाबत आणखी पुरावे जमा करण्यासाठी प्रवेशद्वार सराफ बाजारातील कॅमे-यांची तपासणी केली; पण हे सर्व कॅमेरे बंद अवस्थेत आढळून आले.

सीसीटीव्हीत माथेफिरू चित्रित
कॉम्रेडजीवनलाल पाटणी प्रवेशद्वाराच्या पाठीमागील बाजूला कुंदन कांकरिया यांचे किराणा दुकान आहे. या दुकानाच्या पाठीमागील बाजूस ते राहतात. १३ सप्टेंबरच्या रात्री त्यांनी दुचाकी घरासमोर उभी केली होती. सकाळी त्यांना दुचाकीचे सीट फाडून नुकसान केल्याचे दिसले. तेव्हा त्यांनी दुकान परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजची तपासणी केली तेव्हा त्यांना २२ ते २३ वर्षे वयोगटातील दोन मुले तेथे आल्याचे दिसले. त्यातील एकाने डोक्यावरील पांढऱ्या रंगाची गोल टोपी काढून खिशात ठेवली धारदार शस्त्राने दुचाकीचे सीट फाडल्याचे दिसत आहे.
बातम्या आणखी आहेत...