आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bildaram Expensive Houses Than The Houses Of MHADA?

बिल्डरांच्या घरांपेक्षा म्हाडाची घरे महाग का ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-सर्वसामान्य नागरिकांना हक्काचे घर परवडणार्‍या किमतीत मिळावे यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) काम करते. यासाठी पैठण, देवळाई, चिकलठाणा व वाळूज येथील शेकडो एकर शासकीय जमीन प्राधिकरणाला देण्यात आली. त्यावर सदनिका बांधण्यात आल्या, पण म्हाडाने व्यावसायिक धोरणाचा अवलंब करत बिल्डरांच्या सदनिकांपेक्षा अधिक दर ठेवले आहेत. ही दुकानदारी थांबवावी, अशी मागणी माहिती सेवा समितीने मुख्यमंत्री, म्हाडाच्या मुख्य अधिकारी व संचालक तसेच जिल्हाधिकार्‍यांना पत्राद्वारे केली आहे.
म्हाडाने एका सदनिकेसाठी 26 लाख 85 हजार रुपयांचा दर ठरवला आहे. अर्ज करतेवेळी 50 हजार भरणे बंधनकारक आहे. उर्वरित रक्कम 90 दिवसांत तीन टप्प्यांत किंवा एकाच टप्प्यात भरण्याची अट आहे. हे दर व्यावसायिक असल्याचा आरोप माहिती सेवा समितीचे शहराध्यक्ष सत्संगराज सोनवणे, जिल्हाध्यक्ष सुभाष देशमुख, सुनील देशपांडे, रवी कीर्तिशाही, शेख इब्राहिम, राहुल बनकर, संजू हिवाळे आदींनी केला आहे. सदनिकांचे दर कमी करण्यासाठी समितीच्या वतीने मुख्यमंत्री, म्हाडाच्या मुख्य अधिकारी वर्षा ठाकूर, म्हाडा संचालक आणि जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवण्यात आले.
आरोप चुकीचे
ज्यांना दरमहा 50 ते 70 हजार पगार मिळतो अशा मध्यमवर्गीयांसाठी ही योजना आहे. ज्या नागरिकांनी तक्रार केली त्यांनी योजना मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी असल्याचे लक्षात घ्यावे. मिळणार्‍या सुविधा, सदनिकेची जागा हे जाणून घ्यावे. त्यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत वर्षा ठाकूर, मुख्याधिकारी, म्हाडा.
चौकशी व्हावी
म्हाडाचे घर 25 ते 30 लाख आणि बिल्डरांचे 10 ते 15 लाख, मग म्हाडाचे घर लोक कशाला खरेदी करतील? हा विरोधाभास आहे. याची चौकशी व्हावी. मुंबईच्या धर्तीवर औरंगाबादेत जी एकरकमी पैसे भरण्याची योजना सुरू केली आहे ती त्वरित बंद करावी. सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष, माहिती सेवा समिती.
सर्वसामान्यांचे स्वप्न भंगले
म्हाडाच्या धोरणामुळे सर्वसामान्यांचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. यामध्ये गैरव्यवहार झाला आहे. याची चौकशी व्हावी. सदनिकांचे दर कमी करावेत. दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. सत्संगराज सोनवणे, शहराध्यक्ष, माहिती सेवा समिती
म्हाडाचा व्यवसाय