आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक टन कचर्‍यातून 75 किलो बायोगॅस; ग्रीन पॉवर सिस्टिमचे सीईओ चक्रवर्ती यांचे मार्गदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहर कचरामुक्त व्हावे यासाठी सिंधी कॉलनीवासीयांच्या वतीने सीएमआयच्या कार्यालयात मंगळवारी (24 जून) बायोगॅसवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. यात बंगळुरू येथील जीपीएस बायोगॅस सिस्टिमच्या माध्यमातून कचर्‍यापासून मुक्ती कशी मिळवता येते आणि प्रदूषण कसे टाळता येते याचे सादरीकरण ग्रीन पॉवर सिस्टिमचे सीईओ मैनक चक्रवर्ती यांनी केले. एक टन ओल्या कचर्‍यापासून 75 किलो बायोगॅस तयार करता येणे शक्य आहे, याची माहिती त्यांनी दिली.
बंगळुरू येथील ग्रीन पॉवर सिस्टिमचे सीईओ मैनक चक्रवर्ती यांनी आयआयटी सहकार्‍यांच्या मदतीने बायोगॅस सिस्टिम विकसित करण्याच्या उद्देशाने ग्रीन पॉवर सिस्टिमची स्थापना केली. शहरातल्या घनकचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणाला धोका पोहोचवू न होऊ देता प्रक्रिया करण्याचा उपक्रम त्यांनी केला आहे. या उपक्रमाला बंगळुरूत चांगला प्रतिसाद मिळला आहे.

एक टन कचर्‍यातून 70 किलो बायोगॅस : एक टन ओल्या कचर्‍याच्या माध्यमातून 70 किलो बायोगॅस प्राप्त होतो. याबाबत माहिती देताना चक्रवर्ती म्हणाले, यासाठी लागणारी मशीनची किंमत ही साधारण 10 ते 40 लाख रुपये इतकी आहे. दहा स्क्वेअर मीटर जागेत ही मशीन बसवता येते. सध्या जो कचरा गोळा केला जातो, त्यामध्ये 60 टक्के ओला कचरा असतो. त्यामुळे हे वेस्टेज बेस्ट करता येऊ शकते. हॉटेल, शाळा, हॉस्पिटल तसेच ज्या ठिकाणी जास्त लोकांसाठी जेवण बनवले जाते अशा ठिकाणी मशीन बसवणे फायदेशीर आहे. त्यामुळे पर्यावरणाचीही हानी होत नाही. तसेच कचरा साठवण्याच्या समस्येमधूनही काही प्रमाणात मुक्ती मिळेल, असे ते म्हणाले.

सिंधी कॉलनीत कचरा गोळा करण्याचा प्रयोग : सिंधी कॉलनीत गेल्या तीन महिन्यांपासून ओला कचरा गोळा करण्याचे काम केले जाते. त्यामध्ये सकाळी आठ वाजता प्रत्येक घरात ओला कचरा गोळा केला जातो. याबाबत माहिती देताना एसडब्ल्यू एमआरटीच्या सनबीरकौर छाबडा म्हणाल्या, घनकचरा व्यवस्थापन राउंड टेबल या संकल्पनेतून हा प्रयोग राबवण्यात आला आहे. सिंधी कॉलनीतल्या दोन्ही प्रभागात सकाळी आठ वाजता प्रत्येकाच्या घरातून हा ओला कचरा गोळा केला जातो. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास प्राण्यांना खाण्यासाठी हा ओला कचरा दिला जातो.

दुपारी दोन वाजता गांधीनगरवासीय हा कचरा घेऊन जातात. मात्र आता या संस्थेच्या माध्यमातून वेस्टमधून बेस्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या वेळी सीआरटीच्या अध्यक्षा नताशा झरीन यांनीदेखील सादरीकरण केले. तसेच महापालिकेलादेखील हे प्रपोजल देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
(फोटो - सीएमआयच्या कार्यालयात आयोजित कार्यशाळेला उपस्थित पर्यावरणप्रेमी. इन्सेट : मार्गदर्शन करताना सीआरटीच्या अध्यक्षा नताशा झरीन. छाया : मनोज पराती)