आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Biometric System In Aurangabad Municipal Corporation

DB स्टारचा दणका: महापालिकेत बायोमेट्रिक पद्धत सुरू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- महापालिकेत आता 1 मार्च 2013 पासून बायोमेट्रिक पद्धतीने अधिकारी, कर्मचार्‍यांची हजेरी नोंदवली जाणार आहे. लेटलतीफ आणि दांडीबहाद्दरांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना उपायुक्तांनी दिल्या आहेत. ‘अधिकार्‍यांचा उजेड’ या मथळ्याखाली डीबी स्टारने 8 फेब्रुवारी रोजी वृत्त प्रकाशित केले होते.

कार्यालयातून गायब असताना जवळपास सर्वच अधिकार्‍यांच्या दालनातील दिवे दिवसाढवळ्या प्रकाश पाडत होते. यासंदर्भात डीबी स्टारने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महसूल उपायुक्त आणि महापौर कला ओझा यांनी सर्व विभागांची पाहणी केली. त्याचबरोबर गैरहजर राहणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी केली आणि कारणे दाखवा नोटिसाही बजावल्या. त्यानंतर गैरहजर अधिकार्‍यांचा खुलासा समाधानकारक नसल्याने अधिकारी, कर्मचार्‍यांची कार्यालयीन उपस्थिती नोंदवण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्याचे ठरवले. त्यानुसार 1 मार्चपासून मनपातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने नोंदवली जाणार आहे. कामचुकार आणि दांडीबहाद्दर अधिकारी, कर्मचार्‍यांना बायोमेट्रिक पद्धतीचा अवलंब करण्याची सक्त ताकीदही देण्यात आली आहे. तसे आदेशच मनपा प्रशासनातर्फे काढण्यात आले आहेत.

त्रिसूत्रीचा अवलंब करावा
प्रभावी, लोकाभिमुख प्रशासन आणि वक्तशीरपणा या त्रिसूत्रीचा अवलंब सर्वांनी केला पाहिजे. डीबी स्टारच्या वृत्तानंतर आम्ही दोन्ही इमारतींतील विभागांची पाहणी केली. त्यात या गोष्टी दिसून आल्या. हे थांबण्यासाठी आम्ही बायोमेट्रिक पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.
-एम. डी. सोनवणे, महसूल उपायुक्त तथा शहर अभियंता

आता लगाम लागेल
बायोमेट्रिक पद्धत कार्यान्वित केल्याने सदर प्रणालीनुसार मासिक वेतनाची देयके तयार करणे सोपे जाणार आहे. या पद्धतीचा अवलंब न केल्यास वेतन अदा होणार नाही. डीबी स्टारला दिलेला शब्द आम्ही पाळला.
-रवींद्र निकम, उपायुक्त, प्रशासन