आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुन्‍य रुपयात घरच्‍या घरी तयार करा Bird Feeder, या आहेत सोप्‍या पद्धती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - उन्‍हाचा वाढता कडाका जेथे सर्वसुविधांचा उपभोग घेणा-या माणसांसाठी असह्य होतो तेथे चिमुकल्‍या पाखरांचे काय हाल होत असतील. दाणा आणि पाण्‍याच्‍या शोधात रानोमाळ भटकंती करणा-या इवलूशा चिमण्‍या किंवा पाखरांचे उन्‍हाळ्यात चांगलेच हाल होतात. दिवसभर झाडीत दळून राहिले तर, उपाशी पिल्‍लांचे काय होईल. हा प्रश्‍न जसा माणसांना पडतो. तसाच पाखरांनाही. त्‍यामुळे दरवर्षी उन्‍हाळ्यात पक्षी प्रेमी पाखरांसाठी बागेत, घराच्‍या गॅलरीत चारा पाण्‍याची सोय करतात. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला काही असे फोटो दाखवत आहो ज्‍याव्‍दारे तुम्‍हीही अगदी शुन्‍य पैशात घरच्‍या घरी टाकाऊ वस्‍तूंपासून Bird Feeder तयार करू शकता. उन्‍हाळा पाखरांसाठी असह्य....
- उन्‍हाळा पाखरांसाठी असह्य असतो, असे पक्षीमित्र सांगतात.
- धान्‍याची शेत रिकामी होतात, शिवाय पानवठेही आटतात त्‍यामुळे पक्षांचे हाल होतात.
- झाडांची सावली असली तरी, उष्‍ण हवेने पाखरांच्‍या शरीरातील पाण्‍याची पातळी कमी होते.
- दरवर्षी कित्‍येक पक्षी उष्‍माघातानेही दगावतात.
- अगदी कमी वेळेत आपण घरच्‍या घरी पाखरांसाठी Bird Feeder तयार करू शकतो.
Bird Feeder ठेवताना ही काळजी घ्‍यावी....
- घरटे किंवा Bird Feeder वर्दळीच्‍या ठिकाणी लाऊ नये.
- बागेत, गॅलरीत, खिडक्यांचा आडोसा पाहून उंचावर Bird Feeder लावावी.
- लहान मुले किंवा मांजर, कुत्रे पोहोचणार नाही अशा ठिकाणी Bird Feeder टांगावे.
- Bird Feeder घट्ट बांधावे जेणेकरून पाखरांच्‍या हालचालीने ते पडू नये.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, घरच्‍या घरी असे तयार करता येईल Bird Feeder....