आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bird School At Young Engineering Student In Aurangabad

तरुण अभियंत्याच्या घरात भरते पक्ष्यांची शाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उन्हाळ्यात तहानलेल्या पक्ष्यांसाठी एका तरुण अभियंत्याने फ्लॅटच्या गॅलरीत पाणी आणि दाण्याची व्यवस्था केली. शिवाय मधमिश्रित पाणी ठेवले. खारूताईला येता यावे यासाठी झाड आणि गॅलरीला जोडणारा एक फ्लायओव्हरही तयार केलाय. यामुळे रोज किमान 25 ते 30 पक्षी त्याच्या गॅलरीत हक्काने शाळा भरवतात. ‘दिव्य मराठी’ने चिमण्यांसाठी सुरू केलेल्या उपक्रमापासून प्रेरणा घेत 3 वर्षांपासून तो हे काम करत आहे.

गारखेडा परिसरातील निरंतर बागेजवळील श्री कमल अपार्टमेंटमध्ये राजीव आणि अनुराधा पाटील हे दांपत्य राहते. राजीव हे बजाज ऑटोमध्ये आहेत. पीईएस इंजिनिअरिंगमध्ये यंदा बीई इलेक्ट्रिकलच्या अंतिम वर्षाची परीक्षा दिलेला देवेंद्र पाटील त्यांचा मुलगा. शिक्षण घेत असतानाही निसर्ग, पशू-पक्षी आणि प्राण्यांमध्ये रमायला त्यास आवडते.

खास झाडे लावली
देवेंद्रच्या फ्लॅटमधील हॉल आणि बेडरूममध्ये दोन गॅल-याआहेत. त्याच्या आईने येथे विविध प्रकारची 30-35 झाडे लावली आहेत. कॉलनीतील लोकांनी 10 वर्षांपूर्वी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले होते. ही झाडेही आता डौलदार झाली आहेत. झाडांमुळे येथे पक्षी येतात. उन्हाळ्यात देवेंद्रच्या आईने दोन्ही गॅलºयांत भांड्यांत पाणी ठेवायला सुरुवात केली. देवेंद्रला ही कल्पना आवडली. नंतर तो स्वत: दोन गॅलºयांत नियमितपणे मातीच्या भांड्यांमध्ये पाणी आणि धान्य ठेवू लागला.

पक्ष्यांचा लागला लळा
मातीच्या भांड्यांमध्ये पाण्यासोबत गहू, तांदूळ, शेंगदाणे, फळे, भाज्या ठेवण्यास सुरुवात केली. यामुळे पक्ष्यांची संख्या वाढली. दिवसभरात विविध जातीचे किमान 25 ते 30 पक्षी येथे येतात. उन्हाळ्यात ही संख्या 40 पर्यंत जाते. पक्ष्यांच्या किलबिलाटाने पाटील कुटुंबीयांच्या दिवसाची सुरेल सुरुवात होते.

खारूताईसाठी फ्लायओव्हर
अपार्टमेंटमधील झाडांवर मोठ्या प्रमाणात खारूताई यायच्या. त्याही तहानलेल्या असायच्या. त्यांच्या सोयीसाठी देवेंद्रने गॅलरीपासून झाडापर्यंत एक आडवा रॉड टाकला. यामुळे खारूताईला गॅलरीत येणे सोपे झाले. देवेंद्रला फोटोग्राफीचा छंद आहे. आपल्या कॅमेºयाने त्याने गॅलरीतील पक्ष्यांचे विविध मूड्स टिपले आहेत.

‘दिव्य मराठी’पासून घेतली प्रेरणा
समाधान मिळते
- उन्हाळ्यात पाण्याअभावी पक्ष्यांना जीव गमावताना मी बघितले आहे. यामुळेच त्यांच्यासाठी पाण्याची सोय केली. नंतर छंदच लागला. कॅमे-यात पक्ष्यांच्या भावमुद्रा टिपताना मजा येते. यातून वेगळेच मानसिक समाधानही मिळते. -देवेंद्र पाटील, बीई इलेक्ट्रिकल