आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bird Watching At Jaikwadi Dam Issue At Aurangabad

स्वच्छंद विहार नजरेत कैद, जायकवाडी धरण परिसरात आबालवृद्धांनी केले पक्षी निरीक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पाण्यावरपडून परावर्तित होणारी कोवळी किरणे, पक्ष्यांचा किलबिलाट अन् या सर्वांचा अनुभव घेताना निसर्गात रमलेले आबालवृद्ध हे दृश्य दिसले जायकवाडी धरण परिसरात. दररोजच्या धबडग्यातून काहीशी उसंत शोधत दीडशेवर पर्यावरणप्रेमी पक्षी निरीक्षणासाठी धरणाच्या काठावर जमले आणि अनेक स्थानिक, स्थलांतरित पक्ष्यांचा स्वच्छंद विहार त्यांनी नजरेत कैद केला.
एन्व्हाॅयर्नमेंटल रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशन अकॅडमी औरंगाबाद, नेचरवॉक पुणे, वन विभाग, वन्यजीव विभाग सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने "बर्ड फेस्ट'चे आयोजन करण्यात आले होते.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी पक्षिप्रेमींची जायकवाडीच्या काठावरील सैर अविस्मरणीय ठरली. विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी झाले होते. पक्षी अभ्यासक डॉ. दिलीप यार्दी, नितीन सोनवणे, स्वप्निल मोगरे, अमेय देशपांडे, श्रवण परळीकर, श्रीकृष्ण पाटील, किरण परदेशी यांनी उपस्थितांना पक्ष्यांची माहिती दिली.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पक्षिप्रेमींची जायकवाडीची सैर अविस्मरणीय ठरली. महाविद्यालयीन विद्यार्थिनीही या उपक्रमात सहभागी झाल्या. छाया : माजिद खान, मनोज पराती

* ग्रेटर फ्लेमिंगो
* कॉमन पोचार्ड
* विजन
* पिंटेल
* गार्गेनी
* कॉमन टील
* शॉव्हेलर
* रेड क्रस्टेड पोचार्ड
* सी गल
* गडवाल
* ब्लॅक विंग स्टिल्ट
* पाइड किंगफिशर
* ग्रे हेरॉन
* गोल्डन डक
* बार हेडेड गीज
* गॉडविट
जवळून पक्षी पाहिले
-पक्षिनिरीक्षणाचाअनुभव काही औरच आहे. पक्ष्यांचा हालचाली एकदम जवळून पाहता आल्या. दिवसाची सुरुवात एकदम चांगल्या पद्धतीने झाली. विशाखा महाले.

खूप आनंद झाला
-निसर्ग,पक्षी मला खूप आवडतात. त्यामुळे वयाच्या ८३ व्या वर्षीही पक्षी निरीक्षणासाठी मी येथे आले. पक्ष्यांना पाहताना खूप आनंद झाला. नीलमणीखिस्ती.
पर्वणी अनुभवली
-आम्हा हौशी छायाचित्रकारांनी पक्षी निरीक्षणाच्या निमित्ताने आज पर्वणी अनुभवली. पक्ष्यांना दुर्बिणीतून पाहताना पक्षिप्रेमींना आनंद लपवता येत नव्हता. रितेशपेंडसे, हौशी छायाचित्रकार