आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाची जाहिरात देऊन महिलांना फसवणारा भामटा अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-वर्तमानपत्रात लग्नाची जाहिरात देऊन शिक्षिका व वकील महिलेला फसवणार्‍या भामट्याला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली. नेवाशातील अविनाश पाटीलने शहरातील शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्या नावावर साडेदहा लाखांची कार घेतली असून तिचे 25 तोळे सोने पळवले.या भामट्याविरुद्ध नेवाशातील वकील पत्नीच्या जबाबावरून नेवासा पोलिसातही गुन्हा दाखल झाला आहे.
2008 मध्ये पाटीलने लग्नाची जाहिरात दिल्यानंतर त्याला नेवाशातील वकील महिलेने व औरंगाबादमधील शिक्षिकेने मोबाइलवर संपर्क साधला. 2009 मध्ये पाटीलने वकील महिलेशी विवाह केला. लग्नानंतर तो स्वत:ची ओळख लपवत होता. त्यानंतर वर्षभरापूर्वी शहरातील शिक्षिकेलाही त्याने फूस लावली. पती असताना देखील त्याचे निधन झाल्याचे सांगत शिक्षिका त्याच्या प्रेमात पडली. जुलै 2013 मध्ये त्याने कार घ्यायचे असल्याचे शिक्षिकेला सांगितले. तिची कागदपत्रे घेऊन साडेदहा लाखांची कार खरेदी केल्यानंतर त्याने कारखाना टाकण्यासाठी 5 लाख रुपयांची गरज असल्याचे शिक्षिकेला सांगितले. तिने 25 तोळे सोने त्याला दिले. त्यानंतर तो पसार झाला.
अपघात झाल्याची मारली थाप!
शिक्षिकेशी संपर्क तोडण्यासाठी त्याने गुजरातमध्ये कारचा अपघात झाला असून आपण आता शेवटची घटका मोजत असल्याचे शिक्षिकेला सांगितले. वारंवार संपर्क केल्यानंतरही तो होत नसल्याने कारचे कर्ज आणि सोने गेले, अशी भीती शिक्षिकेला वाटू लागली. त्यामुळे तिने गुन्हे शाखेशी संपर्क साधला. याच्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सुभाष खंडागळे आणि त्यांच्या पथकाने त्याला नेवाश्यातून अटक केली. या वेळी त्याच्याकडून कार (एमएच 20 सीएफ 3527), वेगवेगळ्या नावाचे चार पॅन कार्ड, पाच मोबाइल, 18 सिमकार्ड आणि दोन ड्रायव्हिंग लायसन, 20 तोळे सोने जप्त केले.