आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला ४, शिवसेनेला ३, तर एमआयएमला 2 सभापतिपदे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापालिकेच्या प्रभागांचे सभापती आज निवडण्यात आले. त्यात अपेक्षेप्रमाणे भाजपला ४, शिवसेनेला ३, तर एमआयएमला 2 सभापतिपदे मिळाली. काल चार सभापती बिनविरोध निवडून आले होते. आज उर्वरित पाच सभापतींसाठी निवडणूक झाली, त्यातही एक सभापती बिनविरोध निवडून आला, तर बाकीच्या ठिकाणी अपेक्षित निकाल लागले.

आज सकाळी १० वाजता निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. त्यात प्रभाग क्र. 1 मध्ये एमआयएमच्या तसनीमबेगम यांनी शिवसेनेच्या मनीषा लोखंडे यांचा 7 विरुद्ध मतांनी पराभव केला. प्रभाग क्र.2 मध्येही भाजपच्या बबिता चावरिया यांनीही काँग्रेसच्या मलिकाबेगम यांचा 7 विरुद्ध 4 मतांनी पराभव केला. प्रभाग क्रमांक 3 मध्ये साजेदा फारुखी यांच्या विरोधातील उमेदवारांनी माघार घेतल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या. प्रभाग क्र. 6 मध्ये भाजपच्या ज्योती नाडे यांनी काँग्रेसचे सोहेल शेख यांचा 7 विरुद्ध 2 मतांनी पराभव केला, तर प्रभाग क्र. 8 मध्ये शिवसेनेच्या स्मिता घोगरे यांनी काँग्रेसचे अब्दुल नावेद यांचाही 7 विरुद्ध 3 मतांनी पराभव केला. या निवडणुकीची व्यूहरचना करताना तिन्ही प्रमुख पक्षांनी एकमेकांशी बोलूनच सभापतिपदे निश्चित केली होती. प्रभाग क्र. 1 मध्ये शिवसेनेने संधी घेण्याचा प्रयत्न केला पण तेथे संख्याबळच नसल्याने शिवसेनेला पराभवच पत्करावा लागला. या निवडीबाबत शिवसेना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.