आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Candidates Interview In August For State Election

तयारी विधानसभेची: भाजपच्या मुलाखती ऑगस्ट महिन्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड- भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 1 ते 5 ऑगस्टदरम्यान जिल्हास्तरावर घेण्याचे निश्चित केले आहे. 119 मतदारसंघांसाठी निरीक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरच्या तिसर्‍या, चौथ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 14 ऑगस्टपूर्वी उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याचे भाजपने निश्चित केले आहे. त्यामुळे 1 ते 5 ऑगस्टदरम्यान भाजपच्या वाट्याला असलेल्या राज्यातील 119 विधानसभा मतदारसंघांत इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. त्याचबरोबर निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येऊन त्यांच्याकडे जिल्हानिहाय जबाबदारी देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री, औरंगाबाद (पूर्व) तसेच जालना जिल्ह्यातील भोकरदन व परतूर विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी आमदार डॉ. रणजित पाटील (अमरावती) व राज्य सचिव जमाल सिद्दिकी (नागपूर) यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुलडाणा-वाशीम या दोन जिल्ह्यांसाठी औरंगाबादचे माजी महापौर डॉ. भागवत कराड व जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांची निरीक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. माजी मंत्री तसेच प्रदेश उपाध्यक्ष हरिभाऊ बागडे हे निरीक्षक म्हणून पुणे जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेतील. या निरीक्षकांकडे इच्छुकांची जेवढी नावे येतील त्यांची यादी प्रदेशाध्यक्षला देण्यात येईल.