आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात यापुढे भाजपच मोठा भाऊ, प्रदेशाध्यक्ष दानवेंनी शिवसेनेला मारला टोला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भारतीय जनता पक्षाची सदस्य संख्या कमी असल्याने आतापर्यंत पक्षाला छोटा भाऊ म्हणून संबोधले जायचे. सहा नगरसेवक, माजी उपमहापौर व माजी नगरसेवकांनी पक्षात प्रवेश केल्याने आता शहरात भाजप मोठा भाऊ झाला आहे. भाजपचे साठ नगरसेवक निवडून आल्यास महापौर आपलाच होईल, असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सिडको नाट्यगृहात प्रवेश सोहळ्यात ठासून सांगितले.

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नगरसेवक प्रमोद राठोड (सिडको एन-४), रावसाहेब गायकवाड (नक्षत्रवाडी), रवी कावडे (चिकलठाणा), सत्यभामा शिंदे (एसटी कॉलनी, ठाकरेनगर), राजगौरव वानखेडे (यादवनगर, हडको), आगाखान (कैलासनगर), माजी उपमहापौर तरविंदरसिंग धिल्लन, जालिंदर शेंडगे आदींनी भाजपमध्ये प्रवेश घेतला त्या वेळी त्यांनी शिवसेनेला उघड आव्हान दिले. दिले.
यांनीही केला प्रवेश
कल्याण गायकवाड, मनोज घोडके, डॉ. सुनीता साळुंके, माजी नगरसेवक प्रकाश अत्तरदे, निवृत्त शिक्षणाधिकारी पी. व्ही. चव्हाण, बाळासाहेब गंगावणे, अंकुश दानवे, रामेश्वर मिरगळ, प्रताप सानप, किरण मोरे, नितीन साबळे, बालाजी हुलसार, किरण जाधव, माजी नगरसेवक विजय खुडे, जीवनपाल हिवराळे, बाळू गंगावणे, रवी मगरे, रामदास हरणे.
निश्चिंत राहा
भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवक-पदाधिकाऱ्यांना दानवेंनी कुठल्याच प्रकारचे आश्वासन दिले गेले नाही. स्वत:हून पदाधिकारी सहभागी झाल्याचे त्यांनी
भाषणात सांगितले. जाता जाता त्यांनी निश्चिंत राहा, निवांत राहा अडचण येऊ देणार नाही एवढेच प्रवेशकर्त्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
बॅजेेस लावण्याची वेळ : अदवंत
मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते इतर पक्षातून येत असल्याने जुन्या कार्यकर्त्यांना २५ वर्षांपासून काम करतो, अशा आशयाचे बॅजेस लावण्याची वेळ आली असे वाटू लागले. असेही माधुरी अदवंत यांनी सांिगतले.
असे राजकारण : बापू घडामोडे
आजचे राजकारण बेरजेचे नसून गुणाकाराचे आहे. पक्षवाढीसाठी गुणाकार हवाय. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीस भाजपमध्ये मानाचे स्थान आहे. महापालिकेत भाजपचा महापौर होईल.

भाजपच्या ताकदीवर महापौर : तनवाणी
शिवसेनेसोबत सन्मानजनक युती झाली तर ठीक, अन्यथा स्वबळावर मनपाची निवडणूक लढवून भाजपचा महापौर बनवला जाईल. गुलमंडीवर भाजपचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. शहरात स्वबळावर महापौर बनेल.

मन मोठे करावे लागेल : मंगरुळे
एवढ्या मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल होत असल्याने २५ ते ३० वर्षांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. कुटुंब मोठे झाल्याने आता मन मोठे करण्याची गरज आहे.
शिस्तीला वेळ लागेल : शेंडगे
कार्यक्रमात श्रोत्यांकडून टाळ्यासोबत शिट्या वाजवल्या जात होत्या. शेंडगे म्हणाले की, आतापर्यंत ज्यांच्यासोबत होतो त्यांनी आम्हाला दगड मारायला शिकवले. त्यामुळे शिस्त शिकायला अजून थोडा वेळ लागणार आहे.