आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP District President Of The City Will Be Selection On Wednesday

बुधवारी होणार भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षाची निवड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष कोण तसेच ग्रामीणची धुरा पुढील तीन वर्षे कोणाच्या खांद्यावर असेल याचे उत्तर येत्या बुधवारी (१३ जानेवारी) समोर येईल. मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी कोणत्याही परिस्थितीत शहर जिल्हाध्यक्ष नियुक्त करणे पक्षासाठी अनिवार्य झाले आहे. कारण १७ जानेवारीपर्यंत प्रदेशाध्यक्ष निवडणे अपरिहार्य आहे. त्यानंतर २० जानेवारीला राष्ट्रीय अध्यक्ष निवडला जाणार आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या नाहीत तर ही मंडळी प्रदेश तसेच राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवड प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अपात्र ठरतील.

कोणत्याही परिस्थितीत १३ ते १५ जानेवारीदरम्यान नवीन जिल्हा शहराध्यक्ष नियुक्त झालेले असतील, असे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले. बरोबर तीन वर्षांपूर्वी फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्ष अन्य कार्यकारिणी जाहीर झाल्या होत्या. यंदाही त्याच गतीने प्रक्रिया सुरू आहे. मात्र, २० जानेवारीला राष्ट्रीय अध्यक्षांची निवड अथवा पुनर्निवड जाहीर होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्या आधी प्रत्येक जिल्हा शहराचे प्रतिनिधी निवडणे गरजेचे आहे. त्यानुसार शहरात वाॅर्ड कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्या आहेत. शहरातील मंडळांपैकी एका वाॅर्डाचा अध्यक्ष शुक्रवारी ठरवण्यात आला. शनिवारी सायंकाळपर्यंत अन्य मंडळ अध्यक्ष निश्चित केले जातील. त्यानंतर शहराध्यक्ष निवडीचा मार्ग मोकळा होईल.

स्पर्धेतील चेहरे
आमदार अतुल सावे, डॉ. भागवत कराड शिरीष बोराळकर. यातील डॉ. कराड बोराळकर हे प्रदेश कार्यकारिणीवर आहेत, तरीही ते स्पर्धेत आहेत. सावे यांची शहराध्यक्षपद घेण्याची इच्छा आहे. डॉ. कराड प्रदेश पातळीवर असले तरी मुंडे समर्थकांना अडगळीत टाकण्यात येत नाही, हे दर्शवण्यासाठी पक्षाला त्यांच्या नावाची गरज आहे. प्रदेश प्रवक्ते असले तरी बोराळकर यांचे नाव काहींनी पुढे केले आहे. स्थानिक पदाधिकारीच शहर जिल्हाध्यक्षांची निवड करतील, असे नेते सांगत असले तरी प्रत्यक्षात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेच एका नावावर अंतिम मोहोर लावणार आहेत. त्यामुळे दानवेंना या पदावर कोण हवे, याचे उत्तर बुधवारी समोर येईल.
शहराध्यक्षपदाचे चर्चेतील चेहरे : माजी आमदार किशनचंद तनवाणी, माजी उपमहापौर संजय जोशी, संजय केणेकर, स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात, माजी नगरसेवक अनिल मकरिये, हेमंत खेडकर विजय साळवे.

निरीक्षक मंगळवारी येणार
औरंगाबादचा शहराध्यक्ष निवडण्याची जबाबदारी सोलापूरचे भाजप आमदार सुरेश देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ते मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी सकाळी शहरात येतील. त्यांच्या उपस्थितीत हे सोपस्कार पूर्ण केले जातील. ग्रामीणचा जिल्हाध्यक्ष निवडण्याची जबाबदारी आमदार अमर साबळे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तेही मंगळवार किंवा बुधवारी शहरात येणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

संक्रांतीच्या आधी निवड
१७ जानेवारीला प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल किंवा विद्यमान अध्यक्षाला पुढील तीन वर्षांसाठी निवडले जाईल. त्यानंतर २० जानेवारीला राष्ट्रीय अध्यक्ष निवडला किंवा पुनर्नियुक्त केला जाईल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत १३ ते १५ जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व जिल्हा शहराध्यक्ष निवडणे पक्षासाठी क्रमप्राप्त आहे. यंदा १५ जानेवारीला मकर संक्रांत आहे. त्याआधीच शहर जिल्हाध्यक्ष पदावर आरूढ झालेले असतील.