आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या ‘एकनाथां’ची ४२ जणांची जिल्हा टीम, नव्या कार्यकारिणीत सरचिटणीस, उपाध्यक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांनी आपली नवी टीम गुरुवारी (९जून) सायंकाळी जाहीर केली. यात जिल्ह्याच्या सर्व भागांतील ४२ जणांचा समावेश आहे. सुहास शिरसाठ, रघुनाथ काळे, किशोर धनायत आणि लक्ष्मण औटी यांना सरचिटणीसपद तर जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी नगरसेवक विजय औताडे यांना संधी देण्यात आली आहे. महिलांचे नेतृत्व विजया गव्हाणे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
नव्या कार्यकारिणीत सरचिटणीस, उपाध्यक्ष, चिटणीस, एक कोशाध्यक्ष तर १३ सदस्यांचा समावेश आहे. शहर कार्यकारिणीचे गठन करताना शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी एकाही महिलेला संधी दिली नव्हती. मात्र जिल्हाध्यक्ष जाधव यांनी चार महिलांना संधी दिली असून पाचवी महिला महिला आघाडीची अध्यक्षा आहे. जिल्हाभरातील सर्व मंडळ, तालुक्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून कार्यकारिणी निश्चित केली असून रुसवे फुगवे किंवा नाराजी नसल्याचा दावा जाधव यांनी केला आहे.

नूतन कार्यकारिणी अशी :
अध्यक्ष-एकनाथ जाधव; सरचिटणीस- सुहास शिरसाठ, रघुनाथ काळे, किशोर कारभारी धनायत लक्ष्मण एकनाथ औटी; उपाध्यक्ष- साहेबराव डिघुळे, सजनराव मते, दिलीप सखाराम दानेकर, मंगल वाहेगावकर, राजेंद्र जैस्वाल, संजय खंबायते, सांडु जाधव, ज्ञानेश्वर जगताप; चिटणीस- डॉ. संजय गव्हाणे, संजय त्रिभुवन, विवेक चव्हाण, रेणुका बोबडे, शुभांगी पडूळ, प्रशांत कंगले, अशोक तुपे, बंडू काळे, आबा बरकस; कोशाध्यक्ष- महेश जोशी; जिल्हा प्रसिद्धिप्रमुख- काकासाहेब तायडे; युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष- विजय औताडे; महिला जिल्हा मोर्चा अध्यक्ष- विजया गव्हाणे; अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष- रूपचंद साळवे;सहकारी आघाडी- दत्ता धुमाळ;भटक्या विमुक्त जाती जमाती अध्यक्ष- गोपीनाथ वाघ; अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष- डॉ. जब्बार पटेल; सदस्य- नंदकुमार काळे, प्रल्हाद शिंदे, शिवाजी पाथ्रीकर, शंकुतला शिरसाठ, कृष्णा वासुंदेकर, दीपक शिसोदे, सतीश दांडेकर, लक्ष्मण जाधव, विठ्ठल सादरे, तुकाराम तारो, भक्तराज मुळे, गंगाराम हिवाळे आणि सुभाष चव्हाण.
बातम्या आणखी आहेत...