आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एमआयएम'मधील दलित नगरसेवकांवर भाजपचा डोळा, ऐनवेळी संधी साधण्याचा डाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापौर निवडणुकीच्या निमित्ताने शक्ती आजमावयाला निघालेल्या भाजपने जर युतीचे फिस्कटले तर आपलाच महापौर व्हावा यासाठी चक्क एमआयएमच्या दलित नगरसेवकांना घेरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. दुसरीकडे, भाजपने आशेला लावले असले तरी प्रत्यक्ष पदरी काहीच न पडल्याने हे अपक्ष नगरसेवक नाराज झाले आहेत.

मनपात युतीचे संख्याबळ जास्त असले तरी या वेळी शिवसेनेवर जरब ठेवण्यासाठी भाजपने महापौर निवडणुकीच्या माध्यमातून संख्याबळ वाढवण्याच्या हालचाली करत शिवसेनेला अस्वस्थ केले आहे. किशनचंद तनवाणी व राजू शिंदे यांनी हालचाली करत अपक्षांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. शिंदे म्हणाले की, आमच्याकडे ४४ नगरसेवक आहेत. आम्ही थेट एमआयएमचा पाठिंबा कदापि मागणार नाही, पण त्यांचे काही नगरसेवक आम्हाला पाठिंबा देणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे. पण, आम्ही ही निवडणूक खूपच सिरियसली घेतली आहे.

पुढे वाचा... एमआयएम केंद्रस्थानी