आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढीव १४ जागांपैकी १० जागा भाजपला; शिवसेनेला फक्त चार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मनपाच्या ११३ पैकी निम्म्या जागा मागणा-या भारतीय जनता पक्षाला जागा वाटपात फायदा झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मावळत्या ९९ सदस्यांच्या सभागृहासाठी २०१० मध्ये निवडणूक झाली तेव्हा शिवसेनेचे ६० तर भाजपकडे ३९ जागा होत्या. या वेळी १४ वाॅर्ड वाढले असून त्यातील १० जागा भाजपला मिळाल्या आहेत. शिवसेनेकडे वाढलेल्या जागांमध्ये फक्त चारच वाॅर्ड मिळाले.

त्यामुळे शहरात शिवसेना हाच मोठा भाऊ असा दावा करण्यात येत असला तरी वाटे होत असताना भाजपच मोठा वाटेकरी असल्याचे स्पष्ट झाले. जागा वाटपासाठी गेल्या १५ दिवसांपासून बैठका सुरू होत्या. १२ व्या बैठकीत जागा वाटप स्पष्ट झाले. त्यात जागा वाढवून द्या, असा भाजपचा घोशा कायम होता. त्यात त्यांना यश आले. एकूण वाॅर्डांचा विचार करता भाजपला ४५ टक्के जागा मिळाल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात त्यांना १० जागा वाढवून मिळाल्या.

पुढे वाचा... भाजपला सहा वाॅर्डांत उमेदवारच नाही