आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Haribhaou Bagade Comment After Modi Rally In Fulambri

बहुमताने सरकार आल्यास जीटीएल, टोलमुक्ती करू - हरिभाऊ बागडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यात भाजपचे सरकार आणा, आम्ही जीटीएल आणि टोलपासून आपली मुक्तता करू, असे आश्वासन माजी मंत्री तथा फुलंब्रीचे उमेदवार हरिभाऊ बागडे यांनी दिले. भाजपच्या १४ उमेदवारांच्या प्रचारार्थ ऑक्टोबरला गरवारे क्रीडा संकुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
सायंकाळी ५:२९ वाजता नरेंद्र मोदी यांचे सभास्थळी आगमन झाले होते. तत्पूर्वी काही उमेदवारांनी भाषणे केली. बागडे म्हणाले, आघाडी सरकारमध्ये शेतकऱ्यांचे हाल झाले असून त्यांच्या शेतमालाला भाव मिळाल्यामुळे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. अतुल सावे म्हणाले, शहरात पायाभूत सुविधांचा अभाव असून पंधरा वर्षांत शहराचा काहीच विकास झाला नाही. १९९५ पूर्वी औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने वाढणारे शहर म्हणून आशिया खंडात नावलौकिक होता. आता मात्र पिछाडीवर पडला. बंब यांनी गंगापूर मतदारसंघात दारूबंदी करण्याचे जाहीर करत राज्यात सरकार आले तर महाराष्ट्राला दारूपासून मुक्त करणार असल्याचे म्हटले.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, अतुल सावे (पूर्व), किशनचंद तनवाणी (मध्य), मधुकर सावंत (पश्चिम), विनायक हिवाळे (पैठण), प्रशांत बंब (गंगापूर), एकनाथ जाधव (वैजापूर), डॉ. संजय गव्हाणे (कन्नड), सुरेश बनकर (सिल्लोड), बबनराव लोणीकर (परतूर), संतोष दानवे (भोकरदन), अरविंद चव्हाण (जालना), नारायण कुचे ( बदनापूर), विलास खरात (घनसावंगी) आदी उमेदवारांसह प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, डॉ. भागवत कराड, प्रशांत देसरडा, संजय केणेकर, अनिल मकरिये, बसवराज मंगरुळे उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीकांत जोशी यांनी केले. डॉ. कराड यांनी आभार मानले.
भेटवस्तू आिण शुभेच्छांचा वर्षाव
१४उमेदवारांनी मोदींना पुष्पहार घातला. केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांनी मोदी यांना तलवार भेट दिली. शहराध्यक्ष बापू घडामोडे यांनी शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा दिला. एकनाथ जाधव, केणेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू आणि शिवाजी महाराजांचा संयुक्त फोटो भेट दिला तर रहाटकर यांनी खादीचे वस्र भेट दिले.