आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा अंतर्गत वाद; 100 कोटींच्या रस्त्याच्या यादीची नागरिकांना प्रतीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आपला मतदारसंघ, भावी मतदारसंघ तसेच वाॅर्डातील जास्त रस्ते व्हावेत यावरून भारतीय जनता पक्षातील नेते, पदाधिकारी तसेच नगरसेवकांत गेले महिनाभर वाद होते. त्यामुळे महापौर भगवान घडमोडे यांनी महिनाभर १०० कोटी रुपयांची यादीच तयार केली नाही. अखेर त्यांनी जुनीच १५० कोटींची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवत असल्याचे माध्यमांसमोर जाहीर केले. प्रत्यक्षात गुरुवारपर्यंत ही यादी जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाली नव्हती. यादी अंतिम करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. एकूणच पक्षांतर्गत कलहात शहरातील कोणत्या रस्त्यांची कामे होणार याची नागरिकांची प्रतीक्षाही लांबली आहे. २७ जूननंतर लगेच यादी दिली असती तर शासनाकडून प्रस्तावही मान्य झाला असता. 

भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये रस्त्यांच्या यादीवरून कलह वाढत चालला होता. त्यामुळे घडमोडे यादीच तयार करू शकले नाहीत. शेवटी एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटल्याने त्यांनी जुनीच यादी पुढे केली. आता या यादीला शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. नगरसेवक सीताराम सुरे यांनी स्थायी समितीत हा मुद्दा मांडला. मनोज बल्हाळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन रस्ते बदला, अशी मागणी केली. ही मंडळी आता जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज विनंत्या करणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...