आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Leader And Revenue Minister Eknath Khadse In Aurangabad

भाजप बहुमत सिद्ध करणार, गरज पडल्यास घेणार राष्ट्रवादी कॉग्रेसचा पाठिंबा - एकनाथ खडसे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भाजपा बारा तारखेला अधिवेशनात बहुमत सिद्ध करणार आणि आहे त्यापेक्षा जास्त मताधिक्य घेईल असा विश्वास महसुलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ट नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला आहे. ते औरंगाबादमध्ये आल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. राष्ट्रवादी कॉग्रेसला आम्ही पाठिंबा मागितला नसतांनाही त्यांनी तो दिला आहे. त्यामुळे गरज पडल्यास त्यांचा पाठिंबा घेवू मात्र शेवटपर्यत शिवसेना पाठिंबा देईल अशी आशा असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
महसुलमंत्री खडसे हे विजय रहाटकर यांच्या मुलीच्या लग्नाच्या निमीत्ताने शहरात आले होते. यावेळी त्यांनी सुभेदारी विश्राम गृहावर जेवण केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सेना सोबत येईल अशी आशा वाटत असल्याचे सांगितले.

स्थिरतेसाठी सेनेने सोबत यावे
यावेळी बोलतांना खडसे म्हणाले की केंद्रात शिवसेनेने बहिष्कार टाकला असला तरी निवडणुकीदरम्यान झालेले आरोप प्रत्यारोप विसरुन शिवसेनेला सोबत घेण्याचे ठरवले आहे. मान अपमानाचा विषय न करता राज्याला स्थिर सरकार यावे यासाठी केंद्रातही त्यांना स्थान देण्याचे ठरवले होते. राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारातही शिवसेनेने बरोबर यावे असे आम्हाला वाटते. लोकांनी निवडून देतांना स्थिर सरकारसाठी सर्वांना निवडून दिले आहे. त्यामुळे आमची पुढे जायची तयारी आहे. आम्ही अनुकुल आहोत आणि शेवटपर्यत शिवसेना सोबत येईल अशी आशा असल्याचे मत खडसे यांनी व्यक्त केले.

तर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार
अल्पमतातलेच सरकार चालणार का याबाबत विचारले असता भाजपचे सरकार हे बहुमतातलेच असेल. त्यामुळे 12 तारखेला आम्ही बहुमत सिद्ध करु. तसेच सध्या आहे त्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळवणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी कॉग्रेसने आम्हाला जाहिर पाठींबा दिला आहे. भाजपने त्यांच्याकडे पाठिंब्यासाठी कोणतीही मागणी केली नव्हती. त्यामुळे गरज पडल्यास त्यांचा पाठीबा घेणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. यावेळी भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे तसेच शिरीष बोराळकर यांची उपस्थिती होती.