आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ मुंडेंचे बेमुदत उपोषण मागे; पतंगराव कदमांसोबत चर्चेनंतर घेतला निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेले भाजपचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी एक दिवसाच बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. राज्याचे पुर्नवसनमंत्री पतंगराव कदमांसोबत चर्चा केल्यानंतर मुंडेने उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत देण्यात यावी, चारा छावण्यांची थकबाकी त्वरित अदा करावी यासह विविध मागण्यांसाठी सोमवारपासून (8 एप्रिल) विभागीय आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषणाला प्रारंभ केला होता. आपल्या आयुष्यातील हे पहिलेच उपोषण असल्याचे सांगत त्यांनी हे उपोषण म्हणजे माझ्या लढाईचा प्रारंभ असल्याचे नमूद केले. शासनाचा प्रतिनिधी आल्याशिवाय आणि मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. परंतु मंगळवारी दुपारी मुंडे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठवाड्यात विहिरीत पडलेल्यांना मदत मिळणार- कदम
मराठवाड्यात पाणी काढतांना विहिरीत पडलेल्यांना एक लाख रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे राज्याचे पुर्नवसन मंत्री पतंगराव कदम यांनी सांगितले. ते औरंगाबादेत बोलत होते.