औरंगाबाद- राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेच नेते संपर्कात आहेत. निवडणुकीत तेच मला मदत करतात. आत्ताचे राष्ट्रवादीचे नेते माझे जुने सहकारी आहेत. त्यांनी अगोदरही मला मदत केली. बीडच्या राष्ट्रवादीत मी फोडाफाडी करणार नसून बीडबाहेर तसा प्रयत्न करीन, असे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे सांगितले.
बीडला जाण्यासाठी ते औरंगाबादला आले होते. या वेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय मुद्दय़ांवर मते मांडली. ते म्हणाले, राहुल गांधींचे मराठवाड्यात येणे म्हणजे भाजपसाठी शुभसंदेश आहे. राहुल जिथे जिथे जातात तेथे काँग्रेसचा पराभव होतो. बीडमधून सुरेश धस यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना बळीचा बकरा बनवले असून धस यांच्याऐवजी जयदत्त क्षीरसागर, प्रकाश सोळंके किंवा अमरसिंह पंडित यांना उभे केले असते तर चांगली लढत राहिली असती, असेही मत मुंडे यांनी मांडले.