आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये \'विजया\'ची केली होती हॅट्रीक, आता भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबादच्या माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्या विजया रहाटकर यांची भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. औरंगाबाद महापालिकेत तीन वेळा खुल्या मतदारसंघातून विजयी होऊन त्यांनी विक्रम प्रस्थापित केला होता. महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर 'divyamarathi.com' पहिली प्रतिक्रिया देतान त्यांनी, महिला सुरक्षीततेला माझे प्राधान्य असेल, असे सांगितले आहे.
कोण आहेत विजया राहाटकर
माजी महापौर विजया राहाटकर या उच्चशिक्षीत आहेत. मुळच्या नाशिकच्या असलेल्या राहाटकर या लग्न होऊन औरंगाबादमध्ये आल्या. त्यांचे पती आहारतज्ज आहेत. त्यांना एक मुलगी आहे. 2009-2010 औरंगाबाद महानगर पालिकेच्या त्या महापौर होत्या. त्यानंतर 2011 पासून त्या राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर काम करु लागल्या.
कल्पक व्यक्तीमत्व
विजया राहाटकर या औरंगाबादच्या महापौर असताना त्यांनी अनेक नव्या योजना शहरात राबवल्या. त्यांच्या कल्पक व्यक्तीमत्वामुळे महापौर पदानंतर त्या राज्याच्या पातळीवर चमकू लागल्या. राज्यातील भाजपच्या प्रत्येक नेत्यांशी त्यांचा संपर्क आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी त्यांचा चांगला संपर्क राहिला आहे. त्यांच्या कल्पक व्यक्तीमत्वामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्या त्यांच्या अनेक प्रकल्पांमध्ये सहभागी होत्या. महिला मोर्चाच्या त्या राष्ट्रीय सरचिटणीस देखील होत्या.

गोपीनाथ मुंडेंची कमी तीव्रतेने जाणवते - विजया राहाटकर
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वासाने मोठी जबाबदारी सोपवली आहे त्याचा मला आनंद वाटतो. नेत्यांचा विश्वास मी सार्थ करून दाखवेन. या क्षणी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची तीव्रतेने उणिव जाणवत आहे. त्यांचे कार्यच माझ्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. केंद्र सरकारने महिलांच्या संदर्भात घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी अणि महिलांची सुरक्षितता याला माझे प्राधान्य असेल. महिलांसाठी अधिकाधिक रोजगार निर्मिती करण्यासाठीही विशेष प्रयत्न करणार आहे.
- विजया रहाटकर