आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच घरात भाजप पदाधिकारी; पत्नी, आईसाठी मागितली तिकिटे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप शहर अध्यक्ष भगवान घडामोडे यांनीही मुलाखत देत उमेदवारी मागितली. छाया : रवी खंडाळकर
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत राजकारणात सग्यासोय-यांचा भरणा अधिक असतो हे नेहमीच पाहायला मिळते. भाजपतही महापालिकेच्या निमित्ताने याचीच प्रचिती पाहायला मिळाली. भाजपच्या मुलाखतीमध्ये पदाधिकारी आणि त्यांच्या नातेवाइकांचाच भरणा अधिक होता. कोणी बायकोला, कोणी आईला, कोणी मुलाला, तर काहींनी भावाला उमेदवारी मागितली. यामध्ये काही पदाधिका-यांच्या उमेदवारांनी एकाच घरात दोन जणांना उमेदवारी मागितली. त्यामुळे भाजप उमेदवारांचा मुलाखतीचा दुसरा दिवस केवळ सग्यासोय-यांचाच असल्याचे पाहायला मिळाले.

सुराणानगरमध्ये राखी प्रशांत देसरडा, कोटला कॉलनीमध्ये भागवत कराड यांच्या पत्नी डॉ. अंजली कराड, तर भाजपचे सरचिटणीस कचरू घोडके यांच्या पत्नी राधा घोडके यांनी सुराणानगर किंवा क्रांती चौकमधून उमेदवारी मागितली. शिवशंकर कॉलनीमधून मधुकर सावंत यांचा मुलगा सचिन मधुकर सावंत, जवाहर कॉलनीमधून जयश्री सुरेंद्र कुलकर्णी यांनी उमेदवारी मागितली. आमदार नारायण कुचे यांचे भाऊ देविदास कुचे यांनी विठ्ठलनगरमधून संधी मिळावी यासाठी मुलाखत दिली. जयभवानीनगरमधून बालाजी मुंडे यांच्या पत्नी मनीषा मुंडे यादेखील इच्छुक आहेत. मयूरबन कॉलनीमधून संजय जोशी यांच्या पत्नी स्वाती संजय जोशी यांनी उमेदवारी मागितली.

एकाच घरातील दोन : या मुलाखतीच्या वेळी
नव्याने पक्षात दाखल झालेल्या पदाधिका-यांनीदेखील घरातून दोन जणांसाठी उमेदवारी मागितली. यामध्ये एन-३, एन-४ या वार्डांतून प्रमोद राठोड यांच्या आई सरला प्रल्हाद राठोड, तर विश्रांतीनगरमधून प्रमोद राठोड यांनी उमेदवारी मागितली. संजय जोशी यांनीदेखील दोन ठिकाणांहून उमेदवारी मागितली आहे. आमदार नारायण कुचे यांच्या पत्नी शीतल नारायण कुचे यांनीदेखील राजनगर मुकुंदनगर येथून उमेदवारी मागितली.

सर्वानुमते ठरवण्यात येईल
मुलाखतीमध्ये उमदेवारांचा मोठा उत्साह होता. मोठ्या प्रमाणात उमेदवार संधी मिळावी यासाठी इच्छुक आहेत. यामध्ये निवडून येणा-याची क्षमता पाहून उमेदवारीचा निर्णय होईल. पदाधिका-यांच्या बाबतीत सर्वानुमते निर्णय घेण्यात येईल.
अतुल सावे, आमदार, भाजप

विठ्ठलनगरमध्ये अनेक वर्षांपासून आमचे काम आहे. त्यामुळे मी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. निवडून येऊ शकतो, हा विश्वास असल्यामुळेच पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.
देविदास कुचे, इच्छुक उमेदवार
पुढे वाचा.. दिग्गजांनी दिल्या मुलाखती