आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापौरपदासाठी वाढवला ‘संघाशी सत्संग’, संघ संघटकांच्या घरी आता इच्छुकांच्या नियमित वाऱ्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुले असलेले महापौरपद मराठा नगरसेवकांनाच द्यावे, अशी मागणी मराठा समाजाने औरंगाबादेत काढलेल्या विराट मोर्चानंतर पुढे रेटण्यात आली. आता यातील इच्छुकांनी महापौरपद आपल्यालाच मिळावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संत्संग वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
भारतीय जनता पक्षात मोठे किंवा मोक्याचे पद मिळवायचे असेल तर संघातील पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय ते शक्य नाही, याची जाणीव ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात दाखल झालेल्या नवख्यांना झाली आहे. त्यामुळेच पक्षातील चार नगरसेवकांपैकी दोघांनी आतापासूनच संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून अनेक वर्षांपासून मित्र असल्यागत त्यांच्या घरी रोज वाऱ्या सुरू केल्याचे समोर आले आहे.

भारतीय जनता पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे दोनदिवसीय शिबिर शनिवार रविवार (२० २१ ऑगस्ट) शहरात होत आहे. याची तयारी पक्षाच्या वतीने करण्यात येत असली तरी त्यामागे संघाचेच नियोजन आहे. संघाचे पदाधिकारी यासाठी मेहनत घेत आहेत. आतापर्यंत संघ म्हणजे काय याची कल्पना नसलेले भाजपचे नवखे नगरसेवक अचानक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या दारी उभे ठाकलेले दिसत आहेत. शिबिराच्या नियोजनाच्या निमित्ताने हे पदाधिकारी संघ पदाधिकाऱ्यांच्या घरी बसून अन्य संघ पदाधिकारी तसेच भाजप पदाधिकाऱ्यांशी मोबाइलवरून संवाद करून देणे, नियोजनात मलाही काम द्या, अशी मागणी करताना दिसत आहेत.

महापौरपदासाठी इच्छुक तसेच चर्चेतील चेहरे
राजगौरव वानखेडे, विजय औताडे (दोघेही भाजपमध्ये नवीन आहेत), शिवाजी दांडगे रामेश्वर भादवे (वानखेडे वगळता अन्य तिघेही पहिल्यांदाच नगरसेवक झाले आहेत, केवळ मराठा म्हणून यांची नावे चर्चेत आहेत), माजी उपमहापौर राजू शिंदे, भगवान घडामोडे हे बुजुर्ग यांचीही नावे चर्चेत आहेत. यातील पहिल्या चौघांसाठी संघ नवीनच आहे.

इच्छुकांची मोर्चेबांधणी
मराठा नगर सेवकांनी आपली मोट बांधल्याचे दिसताच अन्य इच्छुकही आता संघामार्फत ‘फील्डिंग’ लावत असल्याचे समोर आले असून त्यांनीही ‘संघ सत्संग’ निवडला असल्याचे दिसते. शहरातील संघाचे पदाधिकारी कोण आहेत, याची कल्पना नसलेल्या भाजप नगरसेवकांना आता संघाचे पदाधिकारी भाजपच्या नेत्यांपेक्षा जवळचे वाटत असल्याचे पक्षातील ज्येष्ठांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...