आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bjp Member Prashant Desarada In Office Aurangabad

कधी नव्हे ते उपमहापौर रमले स्वत:च्या दालनात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - उपमहापौर प्रशांत देसरडा कधी त्यांच्या दालनात फारसे रमत नव्हते. सोमवारी मात्र ते दिवसभर दालनात बसून होते. भाजपमधून बाहेर पडण्याचे संकेत देऊन पक्षाची नाराजी ओढवून घेतल्याने केवळ दोन नगरसेवक तेवढे त्यांच्या दालनात डोकावून गेले.
देसरडा उपमहापौर झाल्यानंतर दालनाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. ते चार महिने चालले. त्यानंतरही देसरडा तेथे थांबत नसत. जास्त वेळ ते महापौरांच्याच दालनात असत. गेल्या आठवड्यात नारायण कुचे यांच्याशी वाद झाल्यानंतर त्यांनी पक्षात घुसमट होत असल्याची तक्रार करून बाहेर पडण्याचे संकेत दिले. वरिष्ठांकडून मनधरणी होईल अशी त्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात पक्षाने त्यांची दखल घेतली नाही. गोपीनाथ मुंडे, सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले होते. त्यांनीही वेळ दिला नाही. त्यामुळे आज दिवसभर ते दालनात बसून होते. दोघा नगरसेवकांनी सायंकाळी त्यांची भेट घेतली. सायंकाळी त्यांनी एकदा महापौरांच्या दालनातही चक्कर घातली.
कुचे-देसरडा आता आमने-सामने - वाद झाल्यानंतर कुचे आणि देसरडा महापौरांच्या दालनात आमने-सामने झाले. तिळगुळाचा विषय सुरू असल्याने ते एकमेकांना बोलतील अशी पत्रकारांची अपेक्षा होती. मात्र, तसे झाले नाही. दहा मिनिटांत त्यांनी एकमेकांकडे बघणेही टाळले.
* गोपीनाथ मुंडे व्यग्र असल्यामुळे त्यांची भेट अद्यापि होऊ शकली नाही. त्यांच्याशी भेट झाल्यानंतरच मी पुढील वाटचालीविषयी बोलेन. आज काम असल्यामुळे दालनात बसून होतो. - प्रशांत देसरडा, उपमहापौर