आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Natioanal President Amit Shah In Marathwada, Aurangabad Tour

भाजपपाठोपाठ शिवसेना मराठवाड्यात आक्रमक, अमित शहा जालना- औरंगाबादेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या मराठवाड्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी लक्ष केंद्रित केले असतानाच शिवसेनेनेही या भागात आपले आक्रमक रूप दाखवण्यास सुरुवात केली. शुक्रवार, शनिवार शहा औरंगाबाद जालना जिल्ह्यात होते. त्याच वेळी शनिवारपासून शिवसेनेचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी बीड, उस्मानाबाद, परभणी हिंगोलीत दुष्काळस्थितीची पाहणी केली.

मराठवाड्यात मागील वेळी म्हणजे २००९ मध्ये भाजपला ४६ पैकी केवळ दोनच जागा मिळाल्या होत्या. या वेळी त्या १५ वर पोहोचल्या. वास्तविक शहा यांना २६ जागा अपेक्षित होत्या. शिवसेनेला त्याखालोखाल ११ जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेचा येथील पाया खणून काढण्याचा भाजपचा इरादा असल्याची चर्चा आहे. त्यामुळे दुष्काळाच्या निमित्ताने शिंदेंसह आमदार सदा सरवणकर, विजय शिवतारे यांचे पथक विभागात पाहणी करत फिरले.
मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

केंद्राची मदत मिळवणार, गावाचेच पंचनामे ग्राह्य
मराठवाड्यातगंभीर दुष्काळस्थिती असून, केंद्राकडून मदत मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. व्यक्तिगत पंचनाम्याचा नियम शिथिल केला असून, गावपातळीवरील पंचनामे मदतीसाठी पुरेसे ठरतील.

आठवड्यात घोषणा करा, हेक्टरी १० हजार द्यावेत
मराठवाड्यातआठ दिवसांत दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली. मदतीची अडीच हजारांची मर्यादा वाढवून हेक्टरी १० हजार करावी, असेही पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले.