आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप-राष्ट्रवादीत गटबाजी; दुसऱ्या फळीतील नेत्यांना आमदारकीचे वेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- पैठणच्या राजकीय पुढाऱ्यांना आतापासून विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले अाहेत.  सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना भाजपमधील तू तू मै मै अद्यापही थांबलेली नाही.  दिवाळीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी वर्तवली आहे. हे पाहता सर्वच राजकीय पक्षांसह  काही अपवाद वगळता दुसऱ्या फळीतील नेत्यांना आमदारकीचे तिकीट देण्याची तयारी सुरू झाली आहे. तसेच त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्याने दुसऱ्या फळीतील आमदारकीचे स्वप्न रंगवणारे इच्छुक सध्या तालुक्याच्या राजकारण सक्रिय होताना दिसत आहेत. यात भाजप व राष्ट्रवादीमधील दुसऱ्या फळीतील नेते याची तयारी करत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.  शिवसेनेकडे  आमदार भुमरे हे एकच कार्ड असले तरी विकासाच्या मुद्यावरून त्यांच्यावर वरिष्ठ नाराज असल्याने पैठणमधील चित्र काय असेल याची चर्चा आतापासून तालुक्यात सुरू झाली आहे.  
 
पैठण तालुक्यात मागील वीस वर्षांपासून शिवसेनेची सत्ता राहिली आहे. अपवाद गत विधानसभा राष्ट्रवादीची सत्ता होती.  दरम्यान तालुक्यात आमदार संदिपान भुमरे यांचे कायम वर्चस्व राहिले असून मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षांतर्गत प्रचंड विरोध झाला असताना त्यांनी आमदारकी मिळविली. आता त्यांना विरोध नसला तरी त्यांच्या मागे कोर्ट प्रकरण लक्षात घेता त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती विलास भुमरे यांना ही संधी मिळू शकते. शिवाय पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे हा तरुण चेहरा व त्यांचा विकास दुष्टिकोन पाहता त्यांची सेनेकडून लॉटरी लागण्याची शक्यता दिसते. मात्र, सध्या तरी शिवसेनाच्या नेत्यांकडून निवडणुकीला कधी ही तयारीला लागाच्या सूचना असल्या तरी विद्यमान आमदार भुमरे असल्याने त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता नाही. मात्र, भाजपकडून शिवसेनेला  शह देण्यासाठी  तुषार शिसोदे सज्ज झाले आहे. त्यांचे राजकीय व शैक्षणिक जाळे पाहता शिवसेनेला आगामी विधानसभा जड जाणार असली तरी भाजपमध्ये आणखी इतरांनादेखील आमदारकीची तयारी करा अशा सूचना आल्याने तुषार शिसोदे की डॉ. सुनील शिंदे, की आणखी नवीन चेहरा भाजप समोर करणार यावर शिवसेनेतून नवीन की जुनाच चेहरा हे ठरणार आहे.  

राष्ट्रवादीत वाघचौरेच
  राष्ट्रवादी काँग्रेसकडून कायम  माजी आमदार संजय वाघचौरे हे दावेदार राहत आले आहेत. सध्या ही तेच राष्ट्रवादीकडून आपणासच आमदारीकीचे तिकीट मिळेलचा दावा करत असले तरी त्यांच्या पक्षाकडुन रवींद्र शिसोदे यांना देखील आमदारकीची 
तयार करण्याच्या सूचना आल्याने ते मागील वर्षभरापासून तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होताना दिसत असल्याने राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याचे दिसत आहे. यात वाघचौरे यांची मात्र डोकेदुखी वाढणार असे दिसत आहे.   

काँग्रेसला नेतृत्वाचा अभाव
काँग्रेसला तालुक्यात नेतृत्वाचा अभाव असला तरी रवींद्र काळे व विनोद तांबे हे चेहरे पैठण काँग्रेसमध्ये दिसून येतात. यात मात्र मनसेसह इतर पक्षांकडे दुसऱ्या फळीतील नेते दिसत नाहीत.  सध्या तरी शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये तरी दुसऱ्या फळीतील नेत्यांना आमदारीच्या तिकिटाची लॉटरी लागू शकते असे एकूण तयारीवरून दिसून येते.   

दुसऱ्या फळीतील इच्छुकांसाठी संघर्षच   
मागील वीस वर्षांचे राजकारण विचारात घेता पैठणमध्ये जो आमदार झाला त्यांनी आपल्याच पक्षातील दुसऱ्या फळीतील नेत्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविला. आमदार भुमरे यांनी डॉ.सुनील शिंदे यांचा संघर्ष मतदार विसरले नाहीत. दरम्यान मागील वर्षी तर सेनेमधून डझनभर इच्छुकांनी टिकिटाची मागणी केली होती. यात सोमनाथ परदेशी, विजय जाधव, विनायक हिवाळे यांचा प्रमुख समावेश होता. यातील विनायक हिवाळे यांनी भाजपकडून उमेदवारी मिळविली तर तत्कालीन सेनेचे तालुका प्रमुख विजय जाधव यांना पक्षातून बाहेर पडावे लागले. आता भुमरे यांना स्थानिक पक्षातून विरोध नसला तरी पक्ष नेतृत्व कोणाचा विचार करते हे लवकरच कळेल.
बातम्या आणखी आहेत...