औरंगाबाद - विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीसाठी नेमका कोणता निकष राहील यावरून पक्षातच मतभिन्नता असल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले. कामगिरीवरच उमेदवारी मिळेल, असे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, तर गोपीनाथ मुंडे यांनी शब्द दिला होता, त्या 90 टक्के जणांना उमेदवारी देऊ, असे त्यांच्या कन्या पंकजा पालवे यांनी म्हटले आहे.
भाजप कोअर कमिटीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी आमदारांचा परफॉर्मन्स, निवडून येण्याची क्षमता, संघटनात्मक कार्याची पडताळणी करूनच उमेदवारी देऊ, असे स्पष्ट केले. पंकजांनी मात्र मुंडे यांनी शब्द दिला होता, त्या 90 टक्के समर्थकांना तिकीट देऊ अशी ग्वाही दिली. याबाबत फडणवीस यांनीही विश्वास दिला असल्याचा दावा त्यांनी केला.