आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BJP Not Get Candidates For Aurangabad Municipal Corporation Elections

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद मनपा निवडणूक: भाजपला २५ ठिकाणी चेह-यांची शोधाशोध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही भरघोस यश संपादन केल्यानंतर औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावरच लढायची, असा दावा करणा-या भारतीय जनता पक्षाची उमेदवार शोधताना मात्र चांगलीच दमछाक होत आहे. मुस्लिमबहुल वॉर्ड सोडले, तर फक्त ८० वॉर्ड शिल्लक राहतात. त्यातील किमान २५ ठिकाणी उमेदवार मिळत नसल्याचे स्थानिक पदाधिका-यांच्या बैठकीत समोर आले आहे.

अशा २५ वॉर्डांत भाजपची मदार आयातीवरच राहणार असून त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी या विरोधी पक्षांतील कार्यकर्त्यांवर हा राज्यातील मोठा पक्ष आता नजर ठेवून असल्याचे समोर आले आहे. महानगरपालिका निवडणुकीत हा पक्ष सर्वात मोठा आयातदार पक्ष ठरू शकतो, असे संकेतही मिळत आहेत.

गुलमंडी, राजाबाजार येथील सेनेचे विद्यमान नगरसेवक विधानसभा निवडणुकीपूर्वीच भाजपमध्ये दाखल झाल्याने सेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपला उमेदवारांची चिंता नाही; परंतु सिडको, हडकोचा परिसर वगळता मुख्य शहरासह आजूबाजूच्या परिसरातील वॉर्डांत या पक्षाला उमेदवारांची चिंता आहे. नगरसेवक होण्यासाठी आसुसलेली अन्य पक्षांतील मंडळी मोदी लाटेचा फायदा घेण्यासाठी भाजपचे दार ठोठावत असून त्यातील काहींना अशा वॉर्डांतून संधी दिली जाईल, असे संकेत स्थानिक नेत्यांनी खासगीत बोलताना दिले आहेत.

मुस्लिमबहुल वॉर्ड सोडले, तर सर्वत्र भाजपचे कमी-अधिक प्रमाणात नेटवर्क आहे, तरीही चांगले चेहरे मिळत नाहीत, असे नेत्यांचे म्हणणे आहे. यावर कार्यकर्ते मात्र कमालीचे नाराज असल्याचे दिसतात. अनेक वर्षांपासून काम करणा-या कार्यकर्त्याजवळ पैसे नाहीत म्हणून दुस-या पक्षातील आयता उमेदवार आणण्याचा पराक्रम स्थानिक नेते करत असल्याचेही कार्यकर्त्यांनी खासगीत बोलताना म्हटले आहे. दिल्लीत किरण बेदींना आणून थेट मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली. येथे काँग्रेस व राष्ट्रवादीतील पैसेवाल्यांना आणून थेट नगरसेवक केले जाईल. मोदींची लाट असल्याने अनेक जण या पक्षात येण्यासाठी उत्सुक आहे. मोदीच्याच नावावर विजय मिळणार असेल तर बाहेरचा उमेदवार कशाला, आपल्या कार्यकर्त्याला उमेदवारी का नाही, असा सवालही कार्यकर्ते करत आहेत. उमेदवारीसाठी मुलाखती सुरू होतील, तेव्हा या संतापाचा स्फोट होण्याची शक्यता काहींनी वर्तवली आहे.

१२० संभाव्य वॉर्ड
३० मुस्लिमबहुल वॉर्ड

> मुस्लिमबहुल वॉर्डांत उमेदवार देण्याचा भाजपचा प्रयत्न असला, तरी फक्त ८० वॉर्डांत ते जिंकू शकतात.
>८० पैकी २५ वॉर्डांत त्यांच्याकडे उमेदवार नसल्याने शोधाशोध सुरू असून बहुतांश ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पक्षात घेणे सुरू आहेत.
> ही ठिकाणी सेनेच्या उमेदवारांनाही आमंत्रण दिले असून, मनसैनिकही रांगेत आहेत. युती असल्यामुळे शिवसेनेच्या वॉर्डात भाजपचे कार्यकर्तेच तयार होऊ शकले नाहीत.

पुढे वाचा सक्रिय कार्यकर्त्यांची वानवा