आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिका निवडणुकीसाठी भाजपची ठरली रणनीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महानगरपालिका निवडणूक अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये तयारी सुरू झाली असताना केंद्र राज्यात सत्तेत असलेल्या भाजपनेही अाघाडी घेत जय्यत तयारी सुरू केली आहे. या तयारीचा भाग म्हणून प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांच्याकडेच प्रभारीपदी सर्व सूत्रे साेपविल्याची चर्चा अाहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच विभागनिहाय मेळावे अायाेजित केल्याने त्यावर एक प्रकारे शिक्कामाेर्तब झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अाजी-माजी पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी उघडपणे दिसणार अाहे.
भाजप कार्यालयात शहर, मंडल पदाधिकारी तसेच विविध अाघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विभागनिहाय मेळाव्याचे नियाेजन झाले. याप्रसंगी बाेलताना गिते यांनी शासनाचे महत्त्वाकांक्षी निर्णय याेजना घराघरांत पोहोचाव्यात, निवडणुकीत ‘मिशन १००’ असा अाकडा पूर्ण करण्यासाठी तयारीला लागावे, असे अावाहनही केले. शहराध्यक्ष अामदार बाळासाहेब सानप, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, लक्ष्मण सावजी, विजय साने, सरचिटणीस प्रशांत जाधव, सुरेश पाटील, संभाजी मोरुस्कर, पवन भगूरकर अादींनी मनाेगत व्यक्त केले.

मंडलनिहाय मेळाव्यांचे नियाेजन या वेळी जाहीर झाले. त्यानुसार ११ जूनला सायंकाळी ५ला सिडको मंडलचा मेळावा भोळे मंगल कार्यालयात, तर त्याच दिवशी सायंकाळी ला सातपूर मंडलाचा मेळावा हॉटेल अयोध्या येथे, १२ जूनला सायंकाळी वाजता द्वारका मंडल मेळावा जलसा सभागृह, अशोका मार्ग येथे १३ जूनला, मध्य पश्चिम मंडलाचा मेळावा प. सा. नाट्यगृहात, १५ जूनला, पंचवटी मंडल मेळावा नवरंग सभागृहात, १४ जूनला नाशिकरोड मंडलाचा मेळावा उत्सव सभागृहात होणार आहे.

याप्रसंगी प्रशांत आव्हाड, अनिल वाघ, आशिष नहार, बाळासाहेब पाटील, रामहरी संभेराव, दिलीप राऊत, अनिल भालेराव, सुजाता करजगीकर, बापूराव शिनकर, उत्तमराव उगले, नरेंद्र सोनवणे, शैलेश जुन्नरे, प्रकाश दीक्षित, देवदत्त जोशी, अरुण शेंदुर्णीकर आदी उपस्थित हाेते.

गटबाजीची शक्यता
महापालिकेची निवडणूक सर्वच पक्षांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यातच अन्य पक्षांप्रमाणेच भाजपमध्येही आजी-माजी पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी नवीन नाही. मनसेतून भाजपत आलेल्या गितेंवर प्रभारीपदाची जबाबदारी सोपविल्याने, ही गटबाजी उफाळू शकते.
बातम्या आणखी आहेत...