आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापूस, जीटीएलप्रकरणी भाजपचा रास्ता रोको

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कापसाला सहा हजार रुपये भाव द्या आणि जीटीएलचा मनमानी कारभार थांबवा, या मागण्यांसाठी भाजपच्या वतीने सोमवारी आकाशवाणी चौकात रास्ता रोको करण्यात आला. कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत असून शासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. याच्या निषेधार्थ अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला.
या आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष बापू घडामोडे, प्रवीण घुगे, नारायण कुचे, संजय केणेकर, बालाजी मुंडे, दिलीप थोरात, कचरू घोडके, ज्ञानोबा मुंढे, साधना सुरडकर, माधुरी अदवंत, अभिजित पटेल, मनोज भारस्कर,राहुल चौधरी, ललित माळी यांच्यासह सहभागी झाले होते.